डोंबिवलीत विविध अपघातांत १ ठार, १ जखमी
- by Reporter
- Jul 23, 2020
- 1613 views
डोंबिवली (श्रीराम कांदू) : डोबिवलीच्या मानपाडा आणि विष्णूनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या अपघातांच्या २ घटनांमध्ये १ ठार, तर एक जण जखमी झाला आहे. मानपाडा पोलिस ठाण्यात कल्याण-शिळ मार्गावरील पिसवली गावातल्या महात्मा गांधी नगरमध्ये राहणारे अभिमान भीमराव शिंदे (४०) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा विशाल (२३) हा रविवारी सायंकाळच्या सुमारास त्याच्या एम एच ०५ /डी डी/ २१२९ या दुचाकीवरुन टाटा नाक्याकडून खंबळपाडा रोडने एमआयडीसी फेज १ च्या दिशेने जात होता. भोईरवाडी समोरील सार्वजनिक रोडवर
घारडा सर्कलकडून येणाऱ्या एम एच ०५/ ई सी / ८०४९ वरील दुचाकीस्वाराने भरधाव वेगात विशाल याच्या दुचाकीला समोरुन
जोराची धडक दिली. या अपघातामध्ये विशाल याच्या डोके, पाय, पंजा, तसेच उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.
दुसऱ्या घटनेत सुनील भिकाजी सोनावणे (३४) याने विष्णूनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा मित्र सिध्दार्थ लक्ष्मण कांबळे (४०, रा. आंबिवली) हे दोघे मंगळवारी सकाळच्या सुमारास पश्चिम डोंबिवलीतील गरीबाचा वाडा परिसरातल्या श्रीधर म्हात्रे चौकाच्यापुढे सद्गुरूनगरकडे गुप्ते रोड येथून गॅस सिलेंडरने भरलेली दोनचाकी लोखंडी गाडी डिलेव्हरी करण्याकरिता जात होते. अचानक पाठीमागून भरधाव वेगाने एम एच ०५/डी के/ ८२८३ क्रमांकाच्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात सिध्दार्थ कांबळे हा सदर टेम्पोच्या खाली आल्याने जबर जखमी झाला. त्यानंतर टेम्पोचालकाने तेथून पळ काढला. सुनील सोनावणे याने इतर सहकाऱ्यांच्या व तेथे जमलेल्या लोकांच्या मदतीने जखमी सिद्धार्थ याला टेम्पो खालून काढुन रिक्षाने शास्त्रीनगर हॉस्पीटल येथे नेले. तेथील डॉक्टरांनी तपासून सिद्धार्थला दाखल करण्यापुर्वी मयत घोषीत केले. सिध्दार्थच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या फरार टेम्पो चालकाचा पोलिस कसोशीने शोध घेत आहेत.
रिपोर्टर