पावसाळ्यात दरवर्षी कल्याण - डोंबिवलीत दोन हजार कुटुंबाचा जीव टांगणीला
- by Reporter
- Jul 23, 2020
- 358 views
डोंबिवली (श्रीराम कांदू) : कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रात धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा एकुण संख्या ४७१ असल्याची माहिती कल्याण - डोंबिवली महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. यामध्ये धोकादायक इमारती २८४ असून अतिधोकायदायक इमारतींची संख्या १८७ आहे. अतिधोकादायक इमारतीमध्ये राहणाºया कुटुंबाची एकुण संख्या २१७० आहे. त्यामुळे मध्यम ते अतिमध्यम स्वरुपाचा पाऊस पडला तर अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या जीवाला देखील धोका असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र असे असले तरी अतिधोकादायक इमारतींवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे.
कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रात अ प्रभागात धोकादायक इमारतींची संख्या ४ असून यामध्ये ५ कुटुंब राहात आहेत तर अतिधोकादायक इमारतींची संख्या २ असून या इमारतीमध्ये ३ कुटुंब राहतात. ब प्रभाग क्षेत्रात ११ धोकादायक इमारती असून १२६ कुटुंब या इमारतीमध्ये राहत आहेत. तर याच प्रभागात अतिधोकादायक इमारतींची संख्या १० असून ११२ कुटुंब या इमारतीत रहात असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. क प्रभागात ५४ धोकादायक इमारती असून ३२२ कुटुंब या इमारतीत रहात असून याच प्रभागात तब्बल १०२ अतिधोकादायक इमारती असून या इमारतीत ११२७ कुटुंब रहात आहेत. जे प्रभागात धोकादायक इमारती ३२ असून २८५ कुटुंब या इमारतीत रहातात तर याच प्रभागात केवळ २ अतिधोकादायक इमारती असून यामध्ये कोणीच राहत नसल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली. ड प्रभागात धोकादायक इमारत केवळ १ असून अतिधोकादायक इमारतींची संख्या ६ आहे. या इमारतीमध्ये ६१ कुटुंब राहात आहेत.
डोंबिवली येथील फ प्रभागात १४४ धोकादायक इमारती असून २०१६ कुटुंबाचे येथे वास्तव्य करत आहेत. याच प्रभागात एकुण १६ अतधोकादायक इमारती असून या इमारतीत एकुण २२४ कुटुंब रहात असल्याची नोंद पालिकेकडे करण्यात आली आहे. तर ह प्रभागात २५ धोकादायक इमारती असून यामध्ये २९२ कुटुंब रहात आहेत. तर १५ अतिधोकादायक इमारती असून २८३ कुटुंब या इमारतीत राहतात. ग प्रभागात धोकादायक इमारतींची संख्या केवळ ८ असून यामध्ये २४४ कुटुंबे राहतात तर याच प्रभागात ३२ अतिधोकादायक इमारती असून २५३ कुटुंब येथे रहात आहेत. प्रभाग आय मध्ये मात्र अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची संख्या शुन्य आहे. तर इ प्रभागात देखील धोकादायक इमारतींची संख्या ५ असून येथे कोणीही रहात नाही. माज्ञ अतिधोकादायक इमारती दोन असून यामध्ये १०७ कुटुंब राहात असल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली आहे.
दरवर्षी पावसाळा अल्यानंतर धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जात असली तरी जवळपास अतिधोकादायक इमारतीमध्ये राहणाºया कुटुंबाची एकुण संख्या २१७० आहे. यावर्षी कोरोनामुळे पालिकेचे अति धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरीक करत आहेत.
रिपोर्टर