ई-लोक शिक्षा अभियानांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांसाठी ऑनलाइन शिक्षणाचे" ई-दशावतार राष्ट्रीय स्पर्धा"चे आयोजन.
दहा लाखापेक्षा जास्त सदस्यांच्या सहभागानिमित्त डॉ.अमोल बागुल यांचा उपक्रम
- by Reporter
- Jul 22, 2020
- 399 views
अहमदनगर (प्रतिनिधी) : कोरोना लॉकडाऊन प्रतिबंधक कालावधीमध्ये ऑनलाइन शिक्षण व कौशल्य प्रशिक्षणाच्या उपक्रमांमधून साकारलेल्या ई- लोकशिक्षा अभियानामध्ये दहा लाखापेक्षा जास्त सदस्यांच्या यशस्वी सहभागानिमित्त ऑनलाईन शिक्षणाचा मानबिंदू ठरलेल्या सुमारे दहा प्रकारच्या तंत्रस्नेही साधन कौशल्यांना वाव देणाऱ्या "ई- दशावतार" या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दोन राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांनी दिली आहे.
१)उत्कृष्ट शैक्षणिक युट्युब व्हिडीओ,
२)उत्कृष्ट शैक्षणिक गुगल फॉर्म ,३)उत्कृष्ट शैक्षणिक पीडीएफ /डॉक्युमेंट/ग्राफिक /इमेजेस,४)उत्कृष्ट शैक्षणिक फेसबुक लाईव्ह,
५)उत्कृष्ट शैक्षणिक वार्तापत्र /न्यूज पोर्टल, ६) उत्कृष्ट स्टडी फ्रॉम होम पॅटर्न उपक्रम,
७)उत्कृष्ट शैक्षणिक वेबसाईट/उत्कृष्ट शैक्षणिक सॉफ्टवेअर ८)उत्कृष्ट शैक्षणिक ॲप/ एप्लीकेशन
९)उत्कृष्ट शैक्षणिक ब्लॉग १०)उत्कृष्ट शैक्षणिक व्हाट्सअप मेसेज
या दहा प्रकारच्या स्पर्धांचा समावेश असलेल्या ई-दशावतार या उपक्रमात शिक्षकांसाठी
गट १ -बालवाडी ,एलकेजी, युकेजी, प्लेग्रुप, नर्सरीचे शिक्षक
गट २ -इ. पहिली ते इ. चौथीचे शिक्षक
गट ३ -इ. पाचवी ते इ. आठवीचे शिक्षक
गट ४ -इ.नववी ते इ. बारावीचे शिक्षक
या गटांनुसार शिक्षकांनी आपापले ई- शैक्षणिक साहित्य ९५९५५४५५५५ या व्हाट्सअप क्रमांकावर ३१ जुलै २०२० पर्यंत पाठवावे.अधिक माहितीसाठी ७३८५५२२६२२ या क्रमांकावर काही शंका असल्यास संपर्क साधावा.
वरील प्रत्येक शालेय गटातून महिला शिक्षिकांसाठी प्रथम,द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ तीन तसेच पुरुष शिक्षकांमधून प्रथम,द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ तीन अशी राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे.
१)स्पर्धेसाठी कुठलेही प्रवेशशुल्क नाही.स्पर्धेसाठी असलेल्या प्रत्येक ई शैक्षणिक साहित्याबरोबर/प्रवेशिकेबरोबर स्पर्धकाने स्वतःचे नाव, शाळेचे नाव (स्वत:चा ईमेल/जीमेल आवश्यक) इत्यादी माहिती टाकावी.२)वरील सर्व घटकांसाठी अध्यापनातील विषयाचे बंधन नाही.३) सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे ई-प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. ४)मराठी ,सेमी, इंग्रजी, उर्दू हिंदी या माध्यमातून देखील स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. ५)युट्यूब व्हिडिओ ,फेसबुक लाईव्ह, ब्लॉग ,वेबसाईट, ॲप , सॉफ्टवेअर या घटकांची युआरएल लिंक पाठवावी.लिंकबरोबर व्हिडिओ चे टायटल/वर्णन /शीर्षक थोडक्यात द्यावे.
६)उत्कृष्ट शैक्षणिक स्टडी फ्रॉम होम पॅटर्न उपक्रमांमध्ये संपूर्ण कोरोना कालावधीमध्ये शिक्षकांनी अध्ययन-अध्यापन विषयी केलेल्या उपाययोजनांची माहिती पुराव्यासह द्यावी.७)एका शिक्षकास सर्वच स्पर्धांमध्ये सहभाग घेता येईल.८)एका शिक्षकास एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठवता येतील.
रिपोर्टर