
दुकाने पूर्ववत सुरु न झाल्यास आत्महत्या करावी लागेल डोंबिवलीतील मिठाई दुकानदारांची आर्त हाक
- by Reporter
- Jul 22, 2020
- 388 views
डोंबिवली (श्रीराम कांदू) : श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना असल्याने घरात गोड पदार्थ करण्याला अधिक महत्त्व आहे. दरवर्षी मिठाईची दुकाने सुरू असल्याने पेढा, बर्फी यासारख्या मिठाईच्या पदार्थांची खरेदीही मोठ्या प्रमाणावर होते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर दुकाने बंद असल्याने मिठाई व्यापारांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. इतकेच नव्हे तर दुकाने बंद असतानाही ज्यांची दुकाने भाडेतत्वार चालवली जातात त्या मिठाई व्यापाºयांना भाडे भरण्याबरोबरच भरमसाठ विजेचे बील देखील भरावे लागत आहे.त्यामुळे दुकाने पूर्ववत सुरू झाली नाही तर मिठाई व्यापाºयांना आत्महत्याच करावी लागेल अशी आर्त हाक
डोंबिवलीतील मिठाई व्यापा यांनी दिली आहे. मिठाई तयार करण्यासाठी लागणारा मावा हा गुजरातवरून येतो. मात्र सद्यास्थितीत प्रवासाची साधने नसल्याने मावा मिळत नाही. अशावेळी काही मिठाईदारांना दुध विकत घेऊन मावा तयार करावा लागतो. असे असले तरी मावा घालून तयार केलेली मिठाई २४ तासात संपवणे बंधनकारक असते. मात्र २२ मार्चला अचानक टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर तयार केलेला मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहती व्यापाºयांनी दिली. त्यानंतर मात्र दुकाने बंद होती. परंतु सद्यास्थितीत ही दुकाने सम विषम ताारखेला सुरू असतात. त्यामुळे तयार केलेली मिठाई त्याच दिवशी संपवणे बंधनकारक झाले आहे. जर त्या दिवशीच माल संपवला नाही तर दुसºया दिवशी दुकान बंद असल्याने पुन्हा उरलेला माल खराब झाल्याने फेकून द्याावा लागतो. त्यामुळे नुकसान होण्यापेक्षा दुकान बंद ठेवणे हाच एक पर्याय असल्याचे व्यापीर सांगत आहेत. अनेक कर्मचाºयांना गेले तीन महिने पगार देखील दिले जात आहेत. मात्र व्यवसाय जर होत नसेल तर कर्मचाºयांना पगार कसा द्याावा असा प्रश्न देखील हे व्यापारी करत आहेत. इतकेच नव्हे तर काही खवा तयार करणारे कारागीर आपल्या गावी निघून गेले असून ते देखील परत येण्याचे नाव काढत नाहीत. खर तर दहावी , बारावीचे निकाल आणि त्यानंतर सुरू होणाºया श्रावण महिन्यापासून वर्षभर काहीनाकाही निमित्ताने मिठाई लागत असे. मात्र यावर्षी कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाला आहे. काही मेडीकल मध्ये तर फरसाण, बिस्कीटांपासून सर्वच वस्तु विकण्याासाठी ठेवल्या जातात. मेडीकलच्या नावाखाली विविध वस्तु विकत असल्याने अनेक ग्राहक मेडीकल दुकनाता गर्दी करतात. यासंदर्भात तक्रार केली तर प्रशासन दुर्लक्ष करतो मात्र आमची दुकाने सुरू केल्यास तोबडतोब प्रशासनातील कर्मचारी दुकाने बंद करण्यास येतात अशी खंतही मिठाईदार कांदु यांनी व्यक्त केली.
दुकानदारांची वीज बीले माफ करा
महारष्ट्र विद्याुत मंडळाने सरसकट विजेची बिले दुकानदरांना दिली आहेत. मात्र दुकानच बंद असल्याने भरमसाठ विज बीले भरायची कशी असा प्रश्न दुकानदार विचारत आहेत. दुकानदारांना वीज बिले भरण्यासाठी किमान वेळ द्याावा अशी मागमीही अनेक व्यवसायिक करताना दिसून येत आहेत.
रिपोर्टर