कोरोना रिपोर्ट नसल्याने रुग्णालयांनी नाकारल्यामुळे ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू
- by Reporter
- Jul 22, 2020
- 604 views
भांडूप (शेखर चंद्रकांत भोसले) : भांडूप येथील एका ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. रुग्णालयांनी दाखल करुन घेण्यास नकार दिल्याने या महिलेचा मृत्यृ झाल्याचे निर्दशनास आले आहे. महिलेचा पती सदर महिलेस रिक्षातून घेऊन एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात भरती करण्यासाठी धावपळ करत होता. अश्याप्रकारे चार रुग्णालये पालथी घातली पण चारही रुग्णालयांनी कोरोना रिपोर्ट नसल्याने त्यांना दाखल करुन घेण्यास नकार दिला. अखेर सायन रुग्णालयात या महिलेचा मृत्यू झाला.
सुषमा भेलेकर असं या महिलेचे नाव असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुषमा यांचे पती अनिल रविवारी त्यांना रिक्षातून मिठागर, सावरकर आणि डॉ.आंबेडकर हॉस्पिटलला घेवून गेले होते. मात्र, रुग्णालयांनी करोना रिपोर्ट नसल्याने त्यांना दाखल करुन घेण्यास नकार दिला. अखेर रात्री ८ वाजता त्यांना सायन रुग्णालयाने दाखल करुन घेतले. त्यावेळी डॉक्टरांनी कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. सुषमा भेलेकर आपल्या कुटुंबासोबत भांडूप गावात वास्तव्यास होत्या.
दरम्यान माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. सोबतच सुषमा यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? अशी विचारणा केली आहे

रिपोर्टर