दारू का पिता अशी विचारणा केलेल्याने झालेल्या वादात एकाचा मृत्यू! टिळक नगर पोलिसांनी केली एकाला अटक!
- by Reporter
- Jul 20, 2020
- 647 views
मुंबई (जीवन तांबे ) : दारू का पिता अशी विचारणा केल्याने झालेल्या वादातून एका व्यक्तीवर तलवारीने वार केल्याने त्यात त्याचा मृत्यू झला आहे. यातील एका आरोपीला टिळक नगर पोलीसानी अटक केली आहे. अक्षय रेवाले असे या आरोपीचे नांव आहे. टिळकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बंजारा वस्ती मध्ये ता.19 जुलै रोजी ठीक. 08.30 वाजण्याच्या सुमारास मयत जितू गागडा व त्याचा मित्र रॉकी पारचा हे दारू पित होते. त्यावेळी तेथून यातील आरोपी अक्षय रेवाले जात होता तेव्हा आरोपी व मयत यांचा तिथे दारू का पिता यावरून वाद झाला.तेव्हा रॉकी याने अक्षय रेवाले याचे डोक्यात दारूची बाटली मारली त्यात आरोपीचे डोके फुटले.म्हणून आरोपीने त्याचे इतर साथीदार बोलावले ते आल्यावर अनिकेत घायतिडके आतिश घायतिडके संतोष सरदार अक्षय रेवाले यांनी तलवार चाकूने मयत व्यक्तीच्या डोक्यात पाठीत दोन्ही पायावर वार केल्याने जितू गागडा यांचा मृत्यू झाला होता.यातील टिळक नगर पोलिसांनी आरोपी अक्षय रेवाले याला ताब्यात घेतले आहे.
रिपोर्टर