ऑनलाईन शिक्षणाविरुद्ध विद्यार्थी भारती ने पुकारले बंड ! दोन विद्यार्थ्याच्या मृत्यूला जबाबदार काेण ?

डोंबिवली (श्रीराम खंडू) : ऑनलाईन शिक्षण न घेता आल्याने दोन विद्यार्थ्याना
जीव गमवावा लागल्याने ऑनलाईन शिक्षणाविरोधात विद्यार्थी भारती संघटनेने बंड पुकारले आहे. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ने सुद्धा ऑनलाईन लेक्चर सुरू केले आहेत. दिवस भरातून सहा तास हे लेक्चर घेणार असून साधारणतःदोन जीबी डाटा दिवसात लागणार आहे ...वाढत्या  लॉकडाउन मुळे  सामान्य जनतेने आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत,अनेक मजूर गावी गेले आहेत ! मग मोबाईल किंवा रिचार्जे चा खर्च कसा करणार? असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडला आहे. त्यामुळे दोन विद्याथ्यांच्या मृत्यूला जबाबदार काेण ? असा सवाल विद्यार्थी भारतीने केला असून ऑनलाईन शिक्षण बंद करण्यात यावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईमेल द्वारे करण्यात आली आहे. 

जगात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असताना विद्यार्थी वर्ग होरपळून निघतोय ! कोरोनाच्या भीषण काळात परीक्षा घेण्याविरुद्ध विद्यार्थी भारती लढा देत असताना एकीकडे राज्यात ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे ! अनेक शाळा महाविद्यालये ऑनलाईन लेक्चर घेत आहेत. गेल्या १० दिवसात ऑनलाईन शिक्षण न घेता येऊ न शकल्याने दोन बळी गेले आहेत. आदर्श हराले या १५ वर्षीय मुलाने मोबाइल नसल्याने व ऐश्वर्या पाटील या २० वर्षीय फार्मसीच्या विद्यार्थिनीने स्वतःचा जीव संपविला याला जबाबदार कोण ? असा  सवाल विद्यार्थी भारतीचे प्रवक्ते  रत्नदीप आठवले,  शुभम राऊत  यांनी केला आहे. विद्यार्थी भारतीकडून या  दोन्ही विद्याथ्यांना आदरांजली वाहून हे बंड पुकारले आहे.   ऑनलाईन शिक्षण बंद करण्याचा नारा लावत पंतप्रधाना इमेल द्वारे पत्र पाठविण्यात आल्याची माहिती  विद्यार्थी भारतीच्या राष्टीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिली.  तसेच टाटा इन्स्टिट्यूट ने हे ऑनलाईन लेक्चर तात्काळ बंद केले नाहीत तर विद्यार्थी भारतीला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल असा इशाराही विद्यार्थी भारती कडून देण्यात आला 


संबंधित पोस्ट