माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघने राज्य माहिती आयुक्ताना दिले मागण्यांचे निवेदन

नागपुर (शेखर चंद्रकांत भोसले) : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याच्या राज्य कार्यकारणीद्वारे महाराष्ट्र राज्यातील नागपुर विभाग, कोंकण विभाग, अमरावती विभाग, बृहन्मुंबई विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग तसेच राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त यांना आपल्या मागण्यांचे एक निवेदन आज देण्यात आले. निवेदनातील मागण्या पूर्ण न झाल्यास मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपुर येथे याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा यावेळी महासंघतर्फे देण्यात आला आहे . 

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याद्वारे शासनाकडे  अनेक वर्ष पाठपुरावा, आंदोलन, उपोषण व अथक परिश्रम केल्यानंतर भारत सरकार व संसदने केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००२ व नन्तर माहितीचा अधिकार अधिनियम २००५ लागू केला आहे. ब्रम्हास्त्र सारख्या या कायद्यामुळे आजवर जिल्हा स्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय पातळीवरील आणि  आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक मोठे मोठे घोटाळे शासनाच्या आणि जनतेच्या समोर उघड़ झाले आहेत .  यामुळे आज प्रत्येक राज्यात आणि संपूर्ण भारताच्या सर्वच कार्यालयातील भ्रष्टाचार करू पाहणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गात कार्यवाहीची भीती निर्माण झाली असून भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यात शासनाला थोडेफार यश सुद्धा आले आहे. 

परंतु सध्या राज्यात माहितीचा अधिकार अर्ज व अपिले अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली जात आहे व ही संख्या लाखोंच्या घरात आहेत. या कायद्याला शासनाचे अधिकारी व प्रशासक कुठे तरी कमजोर करण्याचे प्रयत्न करीत आहेत, म्हणून या कायद्याला अधिक बळकटपणा आणून याची सक्तीने अंमलबजावणी व्हावी यासाठी नागपूरचे जिल्हाधिकारी  रविन्द्र ठाकरे आणि राज्य मांहिती आयोग कार्यालयाचे उपसचिव रोहिणी जाधव व कक्ष अधिकारी नंदकिशोर राऊत यांना प्रत्यक्ष भेटून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघतर्फे आज निवेदन देण्यात आले.

पुढील १० दिवसात या निवेदनावर आयोगाने गंभीरतेने कोणतीही दखल न घेतल्यास वकीलांद्वारे कायदेशीर नोटिस देण्यात येईल व नंतर मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपुर येथे याचिका दाखल करून दाद मागण्यात येईल, असा आक्रमक ईशारा मांहिती अधिकार कार्यकर्ता महासंघच्या राज्य कार्यकारिणीने या निवेदनात दिला आहे. महासंघचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर, शेखऱ  कोलते,  आरिफ पटेल, राहुल सावजी, रोहित माड़ेवार, सादिक अली, अभिजित पटवा, संजय किणीकर, महेश शंकरपेल्ली, शैलेंद्र जायभाये, संतोष वाघमारे, शरद मराठे , प्रशांत बोरकर, अंबादास पवार यांचा या शिष्टमंडळात समावेश होता .

संबंधित पोस्ट