पवईला सॅनिटायझर कॅनने भरलेला टेम्पो उलटला
- by Reporter
- Jul 17, 2020
- 569 views
मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) : जेवीएलआर वरून ठाणेकडे जाणाऱ्या सेनेटायझर कॅनने भरलेला एमएच०१ सीवी ८३०२ या क्रमांकाचा टेम्पो, पवई प्लाझा येथे उलटल्याची घटना काल सायंकाळी ६ .३० वाजता घडली. या घटनेत चालक बचावला असून सेनेटायझर कॅनचे मोठे नुकसान झाले. यावेळी सिप्झ ते पवई प्लाझा जंक्शन दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक पोलिस आणि पवई पोलिसांनी वाहतुक कोंडीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
रिपोर्टर