डोंबिवलीकर ९१ वर्षीय आजींची कोरोनावर मात

डोंबिवली (श्रीराम खंडू) : पूर्वेकडील छेडा रोडला राहणाऱ्या सुशिला विश्वनाथ जोशी या ९१ वर्षीय आजींनी कोरोनावर मात केली आहे. २८ जून रोजी त्यांची कोरोना टेस्ट झाली. ३० तारखेला त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. बरीच धावपळ करून शेवटी एका खासगी हॉस्पिटलमध्ये या आजींना बेड मिळाला. १० दिवसांनी दुसरी टेस्ट झाली आणि त्या कोरोना निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. शनिवारी या आजी घरी परतल्या तेव्हा त्यांचे स्वागत करण्यात आले. बहुदा डोंबिवलीतील 91 वर्षाची पहिली रुग्ण कोरोनावर मात करणारी असावी.

संबंधित पोस्ट