
दुप्पट रकमेच्या आमिषाने ५२.९० लाखांची फसवणूक
- by Reporter
- Jul 17, 2020
- 1762 views
डोंबिवली (श्रीराम खंडू) : पूर्वेकडील गोग्रासवाडीमध्ये शिवप्रसाद अपार्टमेंटमध्ये राहणारा चेतन दंड याने त्याच्या आईच्या नावाची देसर इन्वेस्टमेंट ही
बेकायदेशीरपणे गुंतवणुक स्कीम चालू करून त्यामध्ये गुंतवणुक केल्यास दरमहा ५ टक्के दराने परतावा मिळेल, अशी फेसबुकवर, गुगल, व्हॉट्सअपवर जाहिरात बनवून ती प्रसारित प्रसारीत केली होती. मात्र या संदर्भात ठाण्यात राहणारे निर्मल शहा (३३) यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरमहा ५ टक्के आणि एका वर्षात दुप्पट परतावा देण्याचे आश्वासन देऊन आमच्याकडून रक्कम स्विकारली व काहीकाळ ठरल्याप्रमाणे पैसे परत केले. परंतु नोव्हेंबर २०१९ पासून कोणताही परतावा दिलेला नाही, अथवा मुद्दल देखील परत केली नाही. निर्मल शहा आणि त्यांच्या परिवाराचे २५ लाख २० हजार, प्रिती ठक्कर व त्यांच्या परिवाराचे २२ लाख ८० हजार, तर मेहुल भट्ट यांचे ४ लाख ९० हजार अशा ५२ लाख ९० हजार रूपयांचा गैरव्यवहार करून आर्थीक फसवणुक केल्याचा आरोप निर्मल शहा यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
रिपोर्टर