सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

डोंबिवली (श्रीराम खंडू) : पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात असलेल्या शंखेश्वर व्हिला इमारतीत राहणाऱ्या आरती लीलाधर वेरलकर (६०) यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांचा मुलगा मंदार (३६) याला २० जून २०१८ ते ३१ मार्च २०२० दरम्यान मुंबईत राहणारा सावकार संतोष गुरव आणि खंबाळपाड्यात राहणारा मध्यस्थी सूरज दळवी या दोघांनी धमक्यांचे सत्र आरंभिले होते. व्याजाने घेतलेल्या कर्जाची परतफेड करूनही या दुकलीने १५ लाखांच्या वसुलीसाठी तगादा लावला होता. अखेर या जाचाला कंटाळून आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचे आरती वेरलकर यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सपोनि महेश जाधव अधिक तपास करत आहेत

संबंधित पोस्ट