स्वर्णमाला ज्वेलर्स दुकानात चोरी!

मुंबई (जीवन तांबे) : चेंबूर येथील चेंबूर कॅम्प परिसरात असलेल्या स्वर्णमाला ज्वेलर्स या दुकानात बुधवारी पहाटे चोरट्यांनी शटर तोडून दीड लाख रूपये किमतीच्या दागिन्यांची चोरी केली.

गॅस कटरच्या सहाय्याने दुकानाचा शटर कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानात शिरून त्यांनी दुकानातील तिजोरी तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिजोरी तोडता न आल्याने चोरट्यांनी दुकानातील इतर चांदीचे आणि काही सोन्याचे असे एकूण दीड लाखांचे दागिने घेऊन पोबारा केला. याबाबत चेंबूर पोलिसांनी गुन्हा दखल करत तपास सुरू केला आहे.

संबंधित पोस्ट