
चुनाभट्टी येथील गुलमोहर मार्गावर झाड उन्मळून पडले!
- by Reporter
- Jul 15, 2020
- 556 views
मुंबई (जीवन तांबे) : मुंबई मधील उपनगरात सतत दोन दिवस पाऊस पडत असल्याने चूनाभट्टी येथील गुलमोहर मार्गावर एक झाड अचानक आज सकाळी उन्मळून पडले सुदैवाने त्यात कोणीही जखमी झालेले नाही.
या इमारती बाहेर मार्गावर उभ्या करण्यात आलेल्या कार वर हे झाड पडल्याने गाडीचे नुकसान झाले आहे.
याबाबत समाजसेवक जितेंद्र जाधव यांनी नगरसेवक कप्तान मलिक व एल विभाग वृक्ष अधिकारी यांना कळविले असता त्यांनी कर्मचाऱ्यांना घटना स्थळी पाठवून झाड कापून
मार्ग मोकळा केला.
रिपोर्टर