विरार: मध्ये अपयश झाकण्यासाठी पालिकेकडून सिलडाऊनची मात्रा?

विरार (दीपक शिरवडकर) : कोरोना रुग्ण वाढू नयेत यावर उपाययोजना करण्यात महापालिकेस पूर्णतःअपयश आले असून वसई-विरारमध्ये कोरोना रूग्णांची संख्या ७२३६ इतकी झाली आहे. पोलीस व पालिका प्रशासनात कोणताही समन्वय दिसत नाही.

विरार पूर्वेकडील साईनाथ नगर,आनंदी नगर,वैष्णवी नगर,केशव नगर,गोपचरपाडा आदी ठिकाणी फिजिकल डिस्टिंगचा पूर्ण फज्जा उडालेला दिसतो.एखाद्या इमारतीत कोरैना रूग्ण आढळल्यास केवळ रुग्णाचे निवास प्रतिबंधित करायचे सोडून संपूर्ण परिसर लाकडी बांबूच्या बँरेकेटसने प्रतिबंधित करून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. आनंदी नगर परिसरात मास्क न लावून फिरणारे,कोठेही गुटखा-तंबाखू खावून थुंकणारे,फिजिकल डिस्टिंग न ठेवणारे,टिबल सीट विना परवाना,नंबर प्लेट नसणाऱ्या दुचाकी स्वारांचा उपद्रवीपणा पहायला मिळतो.खासगी दुचाकी वाहनांवर पोलीस, सैनिक असे बेकायदा स्टीकर्स लावून पोलिसांसमक्ष रस्त्यावर चालविली जातात. कलम १८८ व अन्य कायद्याने उपद्रवींवर कारवाई न करता सर्वसामान्यांना वेठीस धरले जात आहे. आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पालिकेच्या गलथान कारभाराचा फटका बसू शकतो.

संबंधित पोस्ट