ओबीसी संघर्ष सेनेच्या वतीने राज्यातील जिल्हा-तालुका स्तरावर 15जुलै 2020 रोजी धरणे आंदोलन
- by Reporter
- Jul 14, 2020
- 680 views
मागण्या १)महाजोती ला तात्काळ १००० कोटी रुपये निधी द्यावा.
२) ओबीसी, एनटी , व्हीजेएनटी, एसबीसी, प्रर्वगातील मुलां-मुलींना देखील MPSC , UPSC साठी मोफत प्रशिक्षण द्यावे
३) ९३ व्या घटना दुरुस्ती प्रमाणे ओबीसी साठी MBBS व MD साठी २७%आरक्षण कायम ठेवावे
४) ओबिसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी
५) शिक्षकभरती प्रक्रियेत फक्त मागासवर्गीयांचीच (St,Sc,Obc, Nt,Sbc प्रवर्गातील) ५०% पद बिंदूनामावलीचे कारण दाखवून बेकायदेशीर पणे कपात केलेली ५०००+ पदे त्वरित भरण्याचे आदेश १२ feb २०२० ला देऊन ५ महिने उलटले तरी कार्यवाही नाही. हा अन्याय तात्काळ दूर करून आपल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय मिळावा.
६) विविध व्यवसायिक कोर्स साठी बंद केलेली शिष्यवृत्ती चालू करून महागाई निर्देशांकानूसार शिष्यवृत्तीत वाढ करावी.
इत्यादी मागण्यांचे पोस्टर हातात घेऊन फोटो सोशल मीडिया वर घराघरातून दिवसभर फोटो शेअर करावेत, आपला असंतोष व्यक्त करावा. हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करा आणि इतरांना करण्यास प्रेरित करावे.
जिथे संचार बंदी नसेल तर प्रयत्न करावेतच फिजीकल डिस्टसिंग पाळून जिल्हाधिकारी/तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करावेत/प्रत्यक्ष निवेदने द्यावीत.
संचारबंदी असेल आणि शक्य नसेल तर सरकारला आॅनलाईन निवेदने पाठवावीत.लढेंगे जितेंगे प्रा लक्ष्मण हाके
ओबीसी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य
रिपोर्टर