आम्हाला डिजेल दाहिनी नकोय आम्हाला हवय सुसज्ज कोविड हाॅस्पिटल - मनसेची पालकमंत्र्याना भावनिक हाक .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर महानगर पालिकेच्या सभागृह नेत्यांनी उल्हासनगर शहरातील सर्व स्मशानभुमी मध्ये कोविड रुग्णांसाठी आलेल्या सात कोटीच्या निधितुन शहरातील सर्व स्मशानभुमी मध्ये डिजल दाहिनी बसविण्यासाठी पालकमंञ्यां कडे मागणी केली असुन तसे या  माध्यमातून ते  प्रयत्नशिल आहेत. परंतु खरंच या शहराला डिजल दाहिनीची आताच  गरज आहे का आजच्या परिस्थितीत शहरातील जे लोक रोज मरतायेत त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत शहराचा मृत्यूदर वाढला आहे त्यावर लक्ष देण्याऐवजी सत्ताधारी माञ जाळण्याची व्यवस्था करतायेत ही बाब गंभीर आहे.जे मरतायेत त्यांना जाळण्याची व्यवस्था कुठेही होऊ शकते पण जे रोज मरतायेत ज्यांना

क्सिजन.  बेड व व्हेन्टिलेटर बेडची गरज आहे. सरकारी रुग्णालयात कुठेही आय सी यु ची  व्यवस्था नाही. आलेल्या निधीतुन हया उपाययोजना करण्याऐवजी नको ते उद्योग करण्यात सत्ताधारी मग्न आहेत आणि ही बाब निंदनीय आहे.असा आरोपही शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला आहे .त्यानी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मा. पालकमंञी एकनाथजी शिंदे व मा. खासदार श्रीकांत शिंदे यांचे या विषयाकडे लक्ष वेधले असुन त्याना  विनंती केली आहे  की साहेब आम्हांला एक चांगलं सुसज्ज कोविड रुग्णालय दया जेथे आमच्या शहरातील प्रत्येक रुग्णाला कुठेही धावपळ न करता सहज बेड मिळेल व त्या ठिकाणी आक्सिजन व व्हेन्टिलेटरची  सेवा उपलब्ध असेल.साहेब मरणाराचा विचार करण्यापेक्षा जो मरतोय त्याला वाचवा अशी आर्त व भावनिक हाक मनसे चे शहर अध्यक्ष बंडु देशमुख यानी दिली आहे .

त्याच्यासाठी काहीतरी करा आम्हाला आणि आमच्या शहराला आज गरज आहे ती व्हेन्टिलेटर व आक्सिजन बेडची व  रोज मरणाऱ्या  लोकांना वाचविण्याची आलेल्या त्या पैशातुन अशा काहीतरी उपाययोजना करा आम्हाला एक सुसज्ज कोविड रुग्णालय हवय डिजल दाहिनी नाही अशी मागणी केली आहे . आम्ही माणूस मेल्यावर कुठेही जाळू पण लोकांना वाचविण्यासाठी उपाययोजना करा. आणि आपण त्या नक्की कराल व आम्हांला चांगलं व सुसज्ज कोविड रुग्णालय दयाल अशी अपेक्षा सुध्दा शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित पोस्ट