
गौरी- गणपती साठी चाकरमान्यांची व्यवस्था करा रेल्वे प्रवाशी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन ..
- by Reporter
- Jul 14, 2020
- 1080 views
राजापूर (प्रतिनिधी) : कोकणात घरोघरी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.अनेक चाकरमान्यांची गावची घरे बंद असल्याने गणपती आणण्यासाठी त्यांना गावी जावे लागते परंतु सध्याच्या कोरोनाच्या महामारीत अनेक चाकरमान्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या हाताला काम नाही खिशात पैसा नाही अशा संकटकाळात गणेशोत्सव येत आहे म्हणूनच या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीची व्यवस्था करावी अशी मागणी वसई - सावंतवाडी रेल्वे प्रवाशी संघटनेने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
गणपतीचा सण कोकणात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो मात्र सण जवळ येत असताना चाकरमान्यांच्या ह्रदयाची धडधड वाढली आहे गावाला जाण्यासाठी भरमसाठ भाडे द्यायला पैसे नाहीत अशा आणीबाणीच्या स्थितित मायबाप सरकारने चाकरमान्यांना सहकार्य करावे शिवसेना स्थापनेपासून कोकणी माणूस व चाकरमानी शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्याची आठवणही या निमित्ताने प्रवाशी संघाने करून दिली आहे शासनाने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वैद्यकीय तपासणी करूनच एसटीने त्यांच्या गावी सोडावे ई- पास आॅनलाईन करून ते मोफत करावेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एसटीने जाण्याचे व येण्याचे आरक्षण करावे क्वारंटाईन घरातच करून त्याचा कालावधी सात दिवसाचा करावा चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी को रे मार्गावर मुंबई ते थिविम दरम्याने सर्व स्टेशनवर थांबणाऱ्या आरक्षित स्लो रेल्वे गाड्यांची मागणी रेल्वे बोर्डाकडे करावी सर्व बस व रेल्वे आरक्षितच सोडाव्यात त्यामुळे गर्दी होणार नाही व संसर्गाचा धोका ही कमी होईल त्याशिवाय गावी गेल्यावर जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, सरपंच तसेच ग्रामकॄतिदल समिती या सर्वांनी एकत्रित विचार विनीमय करून जाचक अटी व शर्ती शिथिल करून चाकरमान्यांचा त्रासमुक्त गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाला सुचना द्याव्यात अशी मागण्या प्रवाशी संघटनेच्या वतीने शासनाकडे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत
रिपोर्टर