
.. निस्वार्थी वॄत्तीने लढणारा "कोविड योध्दा'.अजिम जैतापकर ... .
- by Reporter
- Jul 13, 2020
- 658 views
मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना विरोधात पुकारलेल्या लढ्यात कर्मचारी अपुरे पडू लागल्याने प्रशासनाने स्वयंसेवकांची मदत घेतली स्वताचे आरोग्य धोक्यात घालून दिवस दिवस प्रशासनाच्या जोडीने काम करायचे म्हणून काहींनी यातून माघारही घेतली मात्र राजापूर शहरांतील एक अवलिया गेले जवळपास साडेतीन महिने कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता स्वयंसेवक म्हणून प्रामाणिकपणे काम करत आहे
या अवलियाचे नाव आहे अजिम जैतापकर लढा कोरोनाशी असो अथवा लोकांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच लोकांच्या मदतीसाठी तत्परतेने लावून जाणारा हा एक समाजसेवी अवलिया आहे अशी आगळी वेगळी ओळख जैतापकर यांनी निर्माण केली आहे आज कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असताना राजापूरात मात्र कोरोना रोखण्यात यश आले आहे त्यासाठी सर्वचजण प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत अजिम जैतापकर गेली साडेतीन महिने प्रशासनाच्या जोडीने स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या आरोग्याची न करता निस्वार्थी भावनेतून जैतापकर अविरतपणे सेवा बजावत आहेत कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांनी स्वयंशिस्त पाळावी यासाठी त्यांनी लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी जैतापकर यांची धडपड सुरू आहे खरेतर अशा योध्दयांचा सन्मान व्हायला हवा हेरवी काही न करता स्वतः ची पाठ थोपटून घेणारे अनेक आहेत मात्र जैतापकर यांच्या सारखे सच्चे समाजसेवी उपेक्षित राहतात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहणाऱ्या अजिम जैतापकर यांच्या कामाचे शहरात कौतुक होत आहे
रिपोर्टर