मनपाच्या "एन" वार्डतर्फे घाटकोपर पश्चिमेस राबवले स्वच्छता अभियान

मुंबई (शांत्ताराम गुडेकर) : मुंबईसह पूर्व-पश्चिम उपनगरातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकातर्फे स्वच्छ मुंबई अभियान सुरू केले आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महापौर,पालिका आयुक्त व सर्व सहा.आयुक्त,अतिरिक्त आयुक्त,उपायुक्त यांचे स्वच्छ, सुंदर व पर्यावरणयुक्त मुंबईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईसह पूर्व- पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान राबविण्यास सुरूवात झाली आहे.या अभियानास वाढता प्रतिसादही मिळत आहे. घर स्वच्छ राहिले तर वार्ड स्वच्छ राहिल… वार्ड स्वच्छ राहिले तर शहर स्वच्छ राहिल... शहर स्वच्छ राहिले तर राज्य स्वच्छ राहिल, पर्यायाने देशही स्वच्छ राहिल. स्वच्छतेमुळे देशाचे आरोग्यही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मनपा घनकचरा व्यवस्थापनचे मोठ्या प्रमाणात योगदान मिळत आहे. स्वच्छ मुंबई संकल्पाला आता मनपाच्या प्रत्येक वार्डने आणखी व्यापक स्वरुप देण्याचे ठरविले आहे.यापुढील काळातही या अभियानाची व्याप्ती वाढवून संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.स्वच्छ मुंबई अभियान हे त्यातलेच एक पाऊल आहे.आज(दि.११ जुलै२०२०) महानगरपालिकेच्या एन वार्डतर्फे घाटकोपर पश्चिमेस असलेल्या चिराग नगर ते एल.बी.एस मार्गावरील आर सिटी माँलपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.वार्ड आँफिसर अजित कुमार अंबी,एई(एसडब्लूएम)एन वार्ड ईरफान काझी यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा एन वार्डचे हरमलकर (ए.एच.एस),सुपरवायजर अतीक शेख,जे.ओ- बी.के.पाटील,जे.ओ-महेश नाईक,जे.ओ-नामदेव कांधे,मनपा एन वार्ड मुकादम आणि कामगार,समाजसेवक खलील अली खोत,शंकर व-हाडी(पीए -वार्ड क्र-१२४ नगरसेविका ज्योती हारुन खान),नाशिर खान,शादाब खान,अन्वर शेख,मनोज राजभर,शिवाजी देसाई यांच्यासह काही एनजीओ पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट