बौद्धजन पंचायत समिती चेंबूर, गोवंडी, मानखुर्द च्या वतीने चेंबूर पालिका माँ, गोवंडी शताब्दी रुग्णालयाला मदतीचा हात!

मुंबई ( जीवन तांबे )मुंबईत कोरोनांने थैमान घातले आहे. पालिकेला मदतीचा हात देण्या करिता अनेक संस्था मदत करीत असतानाच कोरोना रुग्णांना गरम पाणी पाण्याची आवश्यकता पाहता बौद्धजन पंचायत समिती चेंबूर, गोवंडी मानखुर्द विभाग यांच्या वतीने चेंबूर पालिका माँ रुग्णालय व गोवंडी येथील पालिका शताब्दी रुग्णालयातील  कोरोना रुग्णांना करिता विजेवर चालणारी पाणी गरम करण्याच्या किटली देण्यात आल्या आहे.

या माँ रुग्णालयात व शताब्दी रुग्णालयात एकूण 100 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण बरे होऊन गेले आहेत. सध्या 100 कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्ण, डॉकटर, कर्मचारी यांना सतत गरम पाणी पिणे आवश्यक असल्याने बौद्धजन पंचायत समितीने ही यंत्रे वैद्यकीय अधिकारी संजय डोळस यांच्यातकडे सुपूर्द केली. 

यावेळी बौद्धजन पंचायत समितीचे चिटणीस लवेश तांबे तसेच बौद्धजन पंचायत समितीचे व्यवस्थापक मंडळ सदस्य प्रकाश कांबळे आणि अनिरुद्ध जाधव व विभाग उपाध्यक्ष संजय मोहिते, चिटणीस संतोष जाधव, महिला मंडळ सदस्या सुषमा जाधव आणि श्रद्धा जाधव उपस्थित होते

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट