केईएम रुग्णालयातील स्थिती भयानक २० वर्षाचा तरुण भर संध्याकाळी बेडवर आत्महत्या कशी काय करतो?– किरीट सोमैया

या स्थितीला जबाबदार कोण?माध्यमांमध्ये वेगळी बातमी आणि महापालिकेकडे वेगळी माहिती , नक्की काय?दोषी कर्मचारी वर्गावर त्वरित कारवाई व्हावी

मुंबईकेईएम रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून अनोखी स्थिती पाहायला मिळत आहे. चेंबूर येथील २० वर्षीय तरुण शहाजी जानू खरात जवळजवळ १०० हून अधिक लोकांच्या समोर बेडवर आत्महत्या करतो. या प्रकरणात पोलीस अद्याप तपास करत आहेत. मात्र महापालिकेने दिलेलं स्पष्टीकरण आणि माध्यमांमधून प्रसिध्द झालेल्या वृत्तामधून वेगळीच माहिती बाहेर आली आहे. महापालिका सांगते कर्करोगावर उपचार सुरु होते, मग तरुण एवढ्या मोठ्या वॉर्डमध्ये कसा?  तर दुसरीकडे तरुणाने खिडकीत आत्महत्या केल्याचे वृत्त प्रिंट माध्यमांत प्रसिध्द आहे. जर पोलीस तपास करत आहेत तर ते पडताळल्याशिवाय महापालिकेने प्रेसनोट जारी केलीच कशी? रुग्णालयात जे काही घडत आहे हे अत्यंत भयानक असून याप्रकरणी जे कोणी दोषी कर्मचारी वर्ग असेल त्यावर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमैया यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी भोईवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्राद्वारे केली आहे. तसेच भोईवाडा पोलीस स्टेशनची भेटही घेतली केईएम मधील गेल्या काही महिन्यातील धक्कादायक स्थिती कोवीड मृतदेह गायब होणे वॉर्डमध्ये मृतदेहांच्या रांगा रुग्णालयात होणारे मृत्यूची वाढती संख्या आणि आता भर संध्याकाळी आत्महत्या सर्वसामान्य रुग्णांसाठी असलेल्या केईएममधील अशा धक्कादायक प्रकारामुळे लोक घाबरले आहेत. या घटनेत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट