महाराष्ट्रात ६ हजार ७८५ नवे कोरोना रुग्ण,तर २१९ रुग्णांचा मृत्यू
- by Adarsh Maharashtra
- Jul 09, 2020
- 674 views
मुंबई :राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ६ हजार ८७५ कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर २१९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या २ लाख ३० हजार ५९९ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ५५ टक्के आहे. राज्यात करोना मृत्यु प्रमाण ४.१९ टक्के आहे तर एकूण केलेल्या चाचण्यात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या १८.८६ टक्के इतकी आहे.
राज्यात आज 6875 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 230599 अशी झाली आहे. आज नवीन 4067 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 127259 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 93652 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१९ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १२ लाख २२ हजार ४८७ नमुन्यांपैकी २ लाख ३० हजार ५९९ नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ४९ हजार २६३ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४८ हजार १९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
आज २१९ मृत्यूंची नोंद झाली. त्यात मुंबईतील ६८, ठाणे ८, ठाणे मनपा २०, नवी मुंबई मनपा ५, कल्याण डोंबिवली मनपा १८, उल्हासनगर मनपा ३, भिवंडी निजामपूर मनपा ९, मीरा भाईंदर मनपा ३, पालघर १, वसई विरार मनपा ७, रायगड ९, पनवेल मनपा ८, नाशिक ३, नाशिक मनपा १, अहमदनगर १, अहमदनगर मनपा १, जळगाव ६, जळगाव मनपा १, नंदूरबार २, पुणे २, पुणे मनपा १८, पिंपरी चिंचवड मनपा ७, सोलापूर ४, सोलापूर मनपा ४, सातारा ३, जालना १, लातूर मनपा १, नांदेड १, अमरावती मनपा १, नागपूर १, नागपूर मनपा १, अन्य राज्य देशातील १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम