धक्कादाक बातमी ;खाजगी रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा कळस रिपोर्ट; एकाचे उपचार दुसऱ्यावर कोरोना नसताना केले कोरोनाचे उपचार

कल्याणमधील धक्कादायक प्रकार

कल्याण :एका महिला रुग्णावर कॉविड लागण नसताना  उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणात उघड झाला आहे.शहरातील खाजगी रुग्णालयाने केवळ नावे सारखी असल्याने असा गलथान कारभार केला आहे.लागण नसलयाचे  निदर्शनास आल्यानंतर लॅब सह दोन्ही खाजगी रुग्णालयानी एकमेकांवर जबाबदारी ढकलली असून रुग्णाच्या नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे .तर सदर रुग्ण महिलेला उपचारासाठी कल्याणमधील मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी परिसरात राहणाऱ्या नीता सावंत यांची ३ जुलै रोजी प्रकृती खालावल्याने त्यांना कल्याणच्या सिटी क्रिटिकेयर रुग्णालयात खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले .त्यांना सफेद पेशी कमी झाल्याचे सांगत त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले दरम्यान त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली .दुसऱ्या दिवशी कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगत त्यांना कोव्हिडं रुग्णालय ए एन्ड जी रुग्णालयात दाखल करण्यात आले .दोन दिवस या नीता यांच्यावर कोरोना संबधित उपचार करण्यात आले .रुग्णालयाकडून एक इंजेक्शन सांगितल्याने नीता यांचा भाऊ अजय यांनी मुंबई येथील मेडिकलशी संपर्क साधला .मेडिकल चालकाने रिपोर्ट पाठवला असता त्याने नाव जरी सारखेच असले तरी हा रिपोर्ट तुमच्या रुग्णाचा नसल्याचे सांगितले .कुटुंबीयांनी रिपोर्ट पाहिला असता त्यांना नाव नीता सावंत असले तरी वय ४५ वर्ष असल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी तत्काळ ए एंड जी रुग्णालय गाठत जाब विचारला मात्र रुग्णालय प्रशासनाणे आमच्याकडे आलेल्या रिपोर्ट नुसार आम्ही उपचार केल्याचे सांगत जबाबदारी सिटी क्रिटिकेयरवर ढकलली.

कुटुंबीयांनी सिटी क्रिटिकेयर तसेच लॅबचा जाब विचारला असता त्यांनी देखील एकमेकांवर जबाबदारी ढकलली त्यानंतर कुटुंबीयांनी पालिका मुख्यालय गाठत आरोग्य अधिकऱ्याचा भेट घेत हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालया विरोधात कारवाईची मागणी केली दरम्यान या रुग्णाला उपचारासाठी कल्याणमधील मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर सिटी क्रिटिकेयर रुग्णालय प्रशासनाने मात्र आम्हि त्यांच्यांवर योग्य ते उपचार केले त्यानंतर लॅब कडून आलेल्या रिपोर्टनुसार त्यांना उपचारा साठी कोव्हिडं रुग्णालयात पाठवले असे सांगितले .पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकरी डॉ प्रतिभा पानपाटील यांनी याप्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून  शहानिशा करून कारवाई करू अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान एखाद्या रुग्णावर उपचार सुरू असताना त्याचे रिपोर्ट तपासण्याची तसदी न घेता उपचार करणाऱ्या रुग्णालयाकडून सुरू असलेला हलगर्जीपणा रुग्णांच्या जीवावर बेतत असल्याने अशा प्रकारे हलगर्जीपना करणाऱ्या रुग्णालयाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट