डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील निवासस्थानी हल्ला करणाऱ्या हल्लेखोर आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे घाटकोपरमध्ये दहन

घाटकोपर (शांत्ताराम गुडेकर) : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृह निवास्थानावर अज्ञातानी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरातून आंबेडकर अनुयायीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. हल्लेखोरांनी राजगृह परिसरातील वस्तूंची तोडफोड केली आहे. अनुयायीकडून घटनेचा निषेध करत हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे. आज घाटकोपर क्राईम ब्रांच कार्यालय नजदिक असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारा जवळ अनुयायीनी हल्लेखोर आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणाबाजी केली. कोरोनाचा संसर्ग असल्याने आम्ही शांत आहोत प्रशासनाने आरोपींना लवकरात लवकर अटक करून कारवाई करावी अन्यथा आमच्या रागाचा उद्रेक होईल असे अँड. अभिषेक सावंत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

संबंधित पोस्ट