चेंबूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान जवळील टाटाच्या तनिष्का ज्वेलर्स शो-रूमला आग!

मुंबई (जीवन तांबे) : चेंबूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान जवळील टाटाच्या तनिष्का ज्वेलर्स शो- रूमला शॉर्ट सर्किट मुळे आज दुपारी आग लागली. ही आग एक तासात आटोक्यात आणली गेली. मात्र कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

डॉ. बाबसाहेब आंबेडकर उद्याना जवळ महालक्ष्मी हेरिटेज इमारत आहे. या इमारतीच्या खाली टाटाचे तनिष्का ज्वेलर्सचे शो-रूम आहे. या शोरूमला आज दुपारी ठीक. 3 वाजण्याच्या दरम्यान शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या घटनेची माहिती इमारतीतील रहिवाशांनी चेंबूर नाका येथील अग्निशमक दला कळविले असता काही क्षणातच अग्निशमक दलाच्या सात बंब व कर्मचारी घटना स्थळी पोहचून तब्बल एक तासानंतर आग आटोक्यात  आणण्यात आली.
या आगीत कोणतीही जिवंत हानी झालेली नसून  काही प्रमाणात वित्त हानी झालेली आहे.

संबंधित पोस्ट