भाजपचे आमदार अभिमन्यु पवार यांना कोरोनाची लागण

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले औसाचे आमदार अभिमन्यु पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

अभिमन्यु पवार यांनी ट्विट करून त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली. त्यांच्यासोबतच त्यांच्या मुलालादेखील कोरोनाची लागण झाली. ‘मला हलकासा ताप/खोकला जाणवत असल्याने मी व माझ्या कुटुंबीयांनी कोरोना चाचणी केलेली. मी व माझा मुलगा परिक्षीत आम्हा दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने आम्ही वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत’ असं पवार यांनी सांगितलं आहे.

मला हलकासा ताप/खोकला जाणवत असल्याने मी व माझ्या कुटुंबीयांनी कोरोना चाचणी केलेली.मी व माझा मुलगा परिक्षीत आम्हा दोघांची कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आली असल्याने आम्ही वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत.

संबंधित पोस्ट