शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊन पारनेरचे ते 5 नगरसेवक पुन्हा शिवसेनेत

मुंबई (प्रतिनिधी ) राष्ट्रवादीत गेलेल्या पारनेरच्या 5 नगरसेवकांनी आज  पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.
या नगरसेवकांनी आज दुपारी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे अशी आज मातोश्रीवर दाखल झालेल्या नगरसेवकांची नावे  आहेत.

यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, पारनेरचे आमदार निलेश लंके,  संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांची उपस्थिती होती. मिलिंद नार्वेकर यांनी या नगरसेवकांना परत शिवसेनेत आणण्यासंदर्भात त्यांच्याशी यशस्वी चर्चा केली होती.

संबंधित पोस्ट