स्वामी गगनगिरी महाराज भक्तमंडळीची "कोरोना" चे संकट दूर व्हावे, यासाठी श्री गुरूचरणी मनोभावे प्रार्थना !

खोपोली : जगप्रसिध्द  सिध्दजलतपस्वी, विश्वगुरू, योगीराज श्री गगनगिरी महाराज, यांचे श्री गुरूपोर्णिमा ऊत्सवास, महाराजांच्या आवडत्या खोपोली आश्रमस्थानी, सांप्रत सूरू असलेल्या, "कोरोनाच्या" महासंकटा मुळे जाता आले नाही,म्हणून महाराजांच्या लाखोभाविकांनी घरांमध्येच राहून स्वामी गगनगिरी महाराजांच्या तसबिंरीचे पूजन करून आपल्या प्रिय कुटुंबियासमवेत नामस्मरण आणि श्रीगुरूसप्तशती या पोथीचे वाचन केले.व या जागतिक संकटातून समस्त मानव जातीचे संरक्षण करून , पुन्हा सर्व परिस्थिती पूर्वीसारखी व्हावी म्हणून , स्वामी गगनगिरी महाराजांचे पवित्र चरणकमळी मनोभावे प्रार्थना केली .

सदरहू श्री गगनगिरी महाराज श्री गुरुपौर्णिमा उत्सव  महाराजांच्या महाराष्ट्रातील विविध आश्रमांत,तेथील सेवेत असणा-या निवडक सेवेक-यांमार्फत  व आश्रम प्रमुखांच्या उपस्थितीत शासनाने दिलेल्या सर्व अटी व सूचनांचे पालन करीत, साजरा करण्यात आला व या वैश्विक महामारीतून संपूर्ण विश्वाची सुटका व्हावी म्हणून प्रार्थना करण्यात आली.

यावेळी युट्यूब च्या माध्यमातून खोपोली आश्रमांतील श्री गगनगिरी गुरूपुजन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते , त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला व घरामधून श्री गगनगिरी महाराजांच्या दर्शनाचा आनंद लुटला.

विश्वयोगीराज श्री गगनगिरी महाराजांच्या शिकवण व उपदेशाप्रमाणे महाराजांची विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी भक्तमंडळी नेहमीच स्वामी  गगनगिरी महाराजांचे नामस्मरण करीत जनसेवेच्या कार्यामध्ये तत्पर असतात व सदैव विश्वकल्याणाची मंगलमय प्रार्थना करीत असतात.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट