गणेश मूर्तीकारांचा कथा आणि व्यथा.
- by Reporter
- Jul 07, 2020
- 698 views
यंदा 22 आँगस्ट रोजी गणेश चतुर्थी दिवशी गणेशाचे आगमन होत असून 1 सप्टेंबर रोजी अनंतचतुर्थदशीला विसर्जन होत आहे.गणेशोत्सव म्हटले की,आनंद,जल्लोष,गर्दीरोशनाई,आलीच.पण यंदा कोरोना प्रादुर्भाव काळ चालु असल्याने गणेश भक्तांच्या मनात भीतीचे सावट आहे.गणेशोत्सव काळात कोरोना प्रसार होऊ नये म्हणून मोठमोठ्या गणेश मंडळानी अगदी साधेपणाने शासनाच्या आदेशाचे पालन करून ,तोंडाला मास्क लावून ,सोशल डिस्टन्स पाळून गणेश उत्सव करण्याचे ठरविले आहे.मनोरंजनात्मक,राजकीय,वा इतर कार्यक्रम न करता रक्तदान शिबीरे,आरोग्य शिबीरअशी आरोग्या विषयी उपयुक्त ठरणारी शिबीरे जास्तीजास्त भरवून नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येईल.त्यामुळे यास आरोग्यत्सव असेही म्हणता येईल.ही अतिशय स्तुत्य व विधायक स्वरूपाची मंडळाची भूमिका आहे.गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे तसतसा गणेश मूर्तीकारांचा उत्साह,जोम वाढताना दिसत असतो.सध्या केरोना संकटामुळे शासनाने चार फूटा पर्यंत मूर्तीच्या उंचीला परवानगी देण्यात आलेली आहे.मूर्तीकार या गोष्टीचा विचार करूनच मूर्ती बनविण्याचे काम करीत आहे.गणेशमूर्तिकार गणेश मूर्तीना रंग लावणे,लहान मोठी गणशे मंडळाशी संपर्क करून मूर्तीच्या किंमती ठरविणे.आदि कामात मग्न आहेत.कोरोना संकटाचा काळ सुरू झाल्यापासून गणेशमूर्तीकारांच्या समस्येत भर पडली होती.त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार मोठ्या गणेशमूर्ती पेक्षा लहानच मूर्ती बनविण्यास सुरूवात केली हेती.आता मूर्ती विक्रीचे कामही जोरात सुरू होईल.मूर्तीकारांना महाराष्ट्र शासन,मुंबई मनपा,काही सवलती देऊ केल्या आहेत का ? असा प्रश्न विचारला असता,समजले की,काहीही सवलती दिलेल्या नाहीत.मात्र मोठ्या आकाराच्या व मोठ्या प्रमाणात मूर्ती बनविणार्यांना काही सवलती मिळतात.उदा.निवार्याची सोय,मुंबईसारख्या शहरात जागेची टंचाई या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात जाणवते.त्याच प्रमाणे अनेक समस्या आहेत.मूर्तीकाराचे असे मत आहे की,शासन व मनपा कडून जागा,अनुदान,भांडवल,कच्चा माल,याबाबत सुधारणा घडवून आणणे खूपच गरजेचे आहे.हा व्यवसाय केवळ हंगामी स्वरूपाचा असल्याने याकडे व्यवसाय म्हणून न पाहता केवळ एक छंद म्हणून पाहतात.एक कला म्हणून पाहतात.काही मूर्तीकार आपला इतर व्यवसाय नोकरी सांभाळून हा हंगामी व्यवसाय करतात.केवळ आवड,छंद म्हणूनच.प्रथम ते आपल्या नोकरी,व्यवसायाला प्राधान्य देतात.व उरलेल्या वेळात मूर्ती बनवितात.सध्या शहरीकरणामुळे माती मिळणे फारच अवघड झाले असून हा व्यवसाय मातीवरच अवलंबून आहे.जास्ती किंमत देऊन माती आणणे परवडत नाही.गेल्या वर्षीच्या मूर्ती यावर्षी विक्रीला ठेवता येत नाहीत.मूर्तीचा रंग उडून जातो.मग नंतर मूर्तीचा रंग घासून पुसून काढणे हे मोठे जिकीरीचे काम असते वेळ ही जास्तच लागतो.तेवढ्या वेळात नविनमूर्ती तयार होऊ शकते.मूर्तीना रंग ब्रश व स्प्रेच्या साहायाने गरजेनुसार दिला जातो.किंमतीच्या बाबतीत दर वर्षी मात्र वाढच होत असते.या व्यवसायाकडे उदरनिर्वाहाचा व्यवसाय म्हणून मूर्तीकार पाहत नाहीत.यात या व्यवसायाला पर्यायी व्यवसाय म्हणून पाहणारे टिकतील ,कारण लवकरच यामध्ये व्यापारीकरण,बाजारीकरण येऊन गणेशमूर्ती प्लाँस्टीक,फायबरच्या बनविल्या जातील .असे काही गणेशमूर्तीकार बोलून दाखवितात.
भारत कवितके मुंबई कांदिवली मोबा .8652305700
रिपोर्टर