शरद पवारांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपल्यानंतर अजित पवार मातोश्रीवर दाखल
- by Adarsh Maharashtra
- Jul 06, 2020
- 1322 views
मुंबई, ६ जुलै :-राज्यात २ जुलैला झालेल्या पोलीस उपायुक्तांच्या बदल्यां बाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज चर्चा झाली. या चर्चेत गृहमंत्री अनिल देशमुखही उपस्थित होते. मात्र या बैठकीत नक्की काय निर्णय झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. आज मातोश्रीवर जवळपास ४५ मिनिटे यावर चर्चा झाली.
दोन दिवसांपूर्वीच पारनेरमधील शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच, राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यां विषयी अंतर्गत राग आहे. अनेक बदल्या होत असून त्या बदल्याही रद्द करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याच्या मुद्द्यावरही यावेळी चर्चा झाली. या चर्चेत एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून थोड्याचवेळात उपमुख्यमंत्री अजित पवार मातोश्रीवर पोहोचणार असल्याचे समजते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शरद पवार, अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड मातोश्री वरून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता पारनेरमधील मुद्द्यावर अजित पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा होणार असल्याचे समजते.
महाविकास आघाडीचे शरद पवार हे शिल्पकार मानले जातात. त्यामुळे त्यांच्याच पुढाकाराने ठाकरेंपुढे ही नाराजी उघड केली जाण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या अर्थविकासाच्या दृष्टीने व्यवहार खुले करण्याच्या विचारात होते. पण उद्धव ठाकरे सरकारने मात्र त्यांना विश्वासात न घेताच लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला, असं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये काय झालं ते पाहावं लागणार आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम