भांडूपमध्ये संरक्षण भिंत कोसळली नागरिकांमध्ये भीतीच वातावरण.

मुंबई (जीवन तांबे) : गेल्या तीन दिवसापासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असताना या कोसळधार पडणाऱ्या पावसामध्ये अनेक ठिकाणी पाणी सकल भागात तुंबले असून त्याच बरोबर काही ठिकाणी झाडे देखील कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत व काही ठिकाणी सकल भागात पाणी भरून घरात देखील पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या असताना भांडुपमध्ये संरक्षण भिंत कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुबंई उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने भांडुप मध्ये पश्चिमेच्या असणारे गांवदेवी मार्गावरील  अनेक भागात सतत तीन दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी आशा घटना घडल्या असून या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी, येथील राहिवाश्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे त्यातच भांडुप हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्याने अनेक ठिकाणी डोंगराळ भागामध्ये काही कुटुंब राहत आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट