कोरोना अधिकारी असल्याचे बतावणी सांगत एका व्यक्तीची लूट करून फरार झालेला आरोपी बसंत पोलिसांनी केली अटक!

मुंबई (जीवन तांबे) : कोरोना अधिकारी असल्याची बतावणी करून एका पादचारीची लूट करून फरार होणाऱ्या आरोपीला चेंबूर बसंत पोलिसांनी अटक केली आहे.
सोहन गणेश वाघमारे अशा या आरोपी चे नांव आहे.


चेंबूर येथील लाल डोंगर येथे रहाणारे फिर्यादी अब्दुल याकूब शेख वय- ४९ ता. ३० जून रोजी ठीक. ६ वाजण्याच्या सुमारास सरस्वती विद्यालय मार्ग क्रमांक ११ वरून चेंबूर रेल्वे स्थानक कडे संध्याकाळी ठीक. ६ वाजण्याच्या सुमारास चालत जात होते.


अचानक त्या ठिकाणी दोन अनोळखी इसम येऊन आपण कोरोना अधिकारी असल्याचे सांगत त्याच्या कागदपत्र असलेल्या बॅगेची तपासणी करून त्यातील  कॅनरा बँकेचे एटीएम व त्या एटीएमचा पिन नंबर हातचलखीने घेऊन एटीएम मधून ५४०००/- रुपये काढून फसवणूक केली होती.


या फसवणुकी बाबत फिर्यादी शेख यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. चेंबूर बसंत पोलीसानी आरोपी विरोधात गु. र. क्रं २३८/२० कलम ४२०,३४ भादवी अन्वये गुन्हा नोंद करून घेतला होता.


गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक मनोज पाटील,  यादव पो.ह गोडे, पो.शि कदम, साळवे, चामे यांनी गुन्ह्या घाडलेल्या घटनास्थळ जाऊन परिसरातील सर्व सी.सी टीव्ही फुटेज तपासुन गुन्हयात वापरण्यात आलेल्या मोटारकार होंडा सिटी MH - ०४ CM- ७२००  मालकाकडे चौकशी करून आरोपी सोहन गणेश वाघमारे यास अटक  करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.


त्याचा साथीदार अद्याप फरार आहे त्याचा तपास सुरू आहे.
आरोपी वाघमारे यांच्या कडून


फिर्यादीचे कॅनरा बँकेचे  एमटीएम, किंमत नव्वद हजार रुपयांचीची होंडा सीटी क्र. MH ०४ CM ७२०० हस्तगत केली आहे.
पोलीस अद्याप माला हस्तगत केलेल्या बाबत आरोपीची  कसून चौकशी करीत आहे

संबंधित पोस्ट