राष्ट्रीय समाज पक्षाचे पांडुरंगाच्या प्रतिमेला दूधाचा अभिषेक घालून राज्यभर आंदोलन.

मुंबई (भारत कवितके) : महाराष्ट्रभर राष्ट्रीय समाज पक्षाचे पांडुरंगाच्या प्रतिमेला दूधाचा अभिषेक घालून राज्यभर आंदोलन करण्यात आले.
सध्याचे सरकार शेतकऱ्याच्या दूधाला 20 ते 18 रूपये भाव देत आहे.त्यामुळे शेतकऱ्यास अनुदान मिळत नाही.आधिच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी हतबल झाला आहे.राज्यमंत्री महादेव जाणकर दूग्ध विकास मंत्री असताना शेतकऱ्याच्या दूधाला 35 रूपये भाव होता.व 5 रूपये शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान जमा होत होते.आताच्या सरकारला या आंदोलनातून राष्ट्रीय समाज पक्षाने असा इशारा दिला आहे की, येत्या 10 दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या दूधाला भाव वाढवून देऊन तो 35 .रूपये करावा.व शेतकऱ्याच्या  खात्यात 10 रूपये अनुदान जमा व्हावे.अन्यथा राज्यभर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येतील.सद्याच्या सरकारला जाग येऊ दे,व शेतकऱ्याला 10 रूपये अनुदान मिळू दे.ही राष्ट्रीय समाज पक्षाची प्रमुख मागणी आहे.

संबंधित पोस्ट