नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वखर्चाने धूरफवारणी यंत्रे खरेदी करुन लोकार्पण

मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) :  पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढणारे मच्छरांचे प्रमाण तसेच त्यामुळे होणारा डेंग्यूसारखा आजार व इतर साथींचे आजार यापासून आपल्या मतदारसंघातील सर्वच नागरिक निरोगी राहावेत यासाठी विक्रोळी विधानसभा मतदारसंघात रोजच्या रोज परिसरात धूर फवारणी करण्याच्या हेतूने धूर फवारणीची नवीन  ५ यंत्रे स्वतः खरेदी करुन आमदार सुनिल राऊत यांच्यातर्फे ही यंत्रे लोकसेवेसाठी अर्पण करण्यात आली. 

याआधी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विक्रोळीचे आमदार सुनिल राऊत यांनी १० औषध फवारणीचे पंप स्वखर्चाने विकत घेवून ते लोकसेवेसाठी अर्पण केले होते. या यंत्रांद्वारे आपल्या कार्यकर्त्यांमार्फत विक्रोळी, कांजूर, भांडूप परिसरात सातत्याने सॅनिटायझरची फवारणी करण्यात येत आहे. 
    
आपल्या मतदार संघातील जनतेच्या आरोग्याचा सातत्याने विचार करणारे आमदार सुनिल राऊत यांनी याआधी १० सॅनिटायझर फवारणी यंत्रे स्वखर्चाने मतदारसंघात आणली व आता ५ धूर फवारणी यंत्रे स्वखर्चाने विकत घेवून रोजच्या रोज या फवारणी यंत्राद्वारे मतदारसंघात फवारणी करण्यात येत आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आमदार सुनिल राऊत यांच्या सामाजिक कार्याचा आम्हांला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया येथील शाखाप्रमुख दिपक सावंत यांनी यासंदर्भात दिली आहे.


संबंधित पोस्ट