सामाजिक बांधिलकी जपत मोफत मास्क आणि सॅनिटायझर वाटप.

मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) : मुलुंडमधील वाढत्या कोरोना फैलावामुळे आपल्या विभागातील नागरिकांना कोरोणाची लागण होवू नये यासाठी कॉंग्रेसचे ईशान्य मुंबई उपाध्यक्ष कैलास पाटील हे सातत्याने नागरिकांना मदत करत असून नागरिकांच्या स्वसंरक्षणासाठी मास्क आणि सॅनिटायझरचे मोफत वाटप, विभागात सॅनिटायझर फवारणी, गरीबांना अन्नवाटप, गोरगरिबांना धान्यवाटप, इत्यादी सामाजिक कार्ये गेल्या साडेतीन महिन्यांपासून सतत करत आहेत त्याच अनुषंगाने गुरुवारी २ जुलै रोजी कै. रोहिदास पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास पाटील यांनी मुलुंडमधील सुप्रसिद्ध योगेश्वरी कट्टा येथे आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून नागरिकांना मास्क आणि सँनिटायझरचे मोफत वाटप केले तसेच पालिकेच्या सफाई कामगारांना मोफत धान्य वाटप व गणेश मोरे या रुग्णाला वैद्यकीय आणि आर्थिक मदत केली व समाजाप्रति आपली सामाजिक बांधिलकी जपली.  

याप्रसंगी माजी आमदार चरणसिंग सप्रा, जिल्हा अध्यक्ष प्रनील नायर, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, मा. नगरसेवक नंदकुमार वैती, मुंबई सचिव किशोर मुंडेकल, मनसे उपाध्यक्ष सत्यवान दळवी, योगेश्वरी कट्टाचे संस्थापक अध्यक्ष अप्पा साळवी, राजेश ईंगळे, राजन भोसले, भरतभाई अमेसर, राजन गजरे, उदय वैती, किरण भोईर, सुशील पाटील, विकास वैती, रुपेश पाटील, मिलिंद रेडकर, यशराज दुबे, रामपरिहार तसेच विविध पक्षाचे नेते व मित्र परिवार उपस्थित होते.

संबंधित पोस्ट