मुसळधार पाऊसात झाडाच्या फांद्या पडल्याने रहिवाशांच्या घराचे नुकसान

मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) : मुलुंड पूर्व म्हाडा कॉलनी येथील श्री मंगल को.ओ.सो.नंबर ३२ च्या मागील बाजूस काल रात्री झालेल्या मुसळधार पाऊसामुळे एक मोठे झाड पडले. त्याच्या फांद्या मंगलमूर्ती सोसायटीतील काही घरांच्या सभासदाच्या खिडकीवर पडल्याने अनेकांच्या खिडक्यांचे नुकसान झाले. म्हाडा असोसिएशनचे अध्यक्ष रवि नाईक यांनी यासंबंधीची तक्रार पालिकेच्या उद्यान विभागाला करुन त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून झाडाच्या फांद्याची छाटणी करुन परिसर मोकळा केला. 

रात्रीच्या अंधारात झाडाच्या फांद्या खिडकीवर पडल्याने झालेल्या मोठ्या आवाजाने घाबरून नागरिक घराबाहेर पडले. काही वेळातच परिस्थितीचा अंदाज आल्यावर या नागरिकांनी म्हाडा असोशीएशनला कळवले. पालिकेच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येवून फांद्यांची छाटणी केल्याने आता धोका टळला असून रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे, असे म्हाडा असोसिएशनचे अध्यक्ष रवि नाईक यांनी यासंदर्भात सांगितले.

संबंधित पोस्ट