राज्यात दिवसभरात 6,555 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 2 लाख 6 हजार 619 वर
- by Adarsh Maharashtra
- Jul 05, 2020
- 906 views
मुंबई दि,५ जुलै:राज्यात आज 5 जुलै रोजी दिवसभरात 6 हजार 555 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 6 हजार 619 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनावर मात करणा्ऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरीहीकोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार, प्रशासन, डॉक्टर आणि नर्सेस प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.राज्यात आज दिवसभरात 3 हजार 658 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54 टक्के इतकं आहे.
राज्याचा कोरोना मृत्यूदर 4.27 टक्के
राज्यात आतापर्यंत 1 लाख 11 हजार 740 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय राज्यात सध्या राज्यात 86 हजार 40 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरु आहेत. तर राज्यात कोरोमामुळे आज दिवसभरात 151 रुग्णांचा मृत्यू झाला.यामध्ये फक्त मुंबईचे 69 रुग्ण आहेत.राज्याचा कोरोना मृत्यूदर हा 4.27 टक्के एवढा आहे.
राज्यात 6 लाख 4 हजार 463 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये
राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 11 लाख 12 हजार 442 नमुन्यांपैकी 2 लाख 6619नमुने पॉझिटिव्ह (18.57 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 4 हजार 463 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 46 हजार 62 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम