उल्हासनगर मधिल मध्यवर्ती रुग्णालयात तात्काळ व्हेंटिलेटर सेवा उपलब्ध करा . मनसेची मागणी.

उल्हासनगर / प्रतिनिधी :    उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती रुग्णालयाच्या दुरअवस्थे बाबत आरोग्य संचालक डाॕ.अनुप कुमार व उपसंचालक डाॕ. गौरी राठोड यांना रुग्णालयाच्या परिस्थितीती बाबत वेळोवेळी अवगत केले आहे.व तशा बैठकाही झाल्या असुन त्या बैठकांचे  मिनीटस सुध्दा उपलब्ध आहेत.परंतु या रुग्णालयाची दुरअवस्था सुधारण्यासाठी आता  पर्यंत आरोग्य विभागाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत ही खेदाची बाब आहे अशी खंत मनसेचे शहर अध्यक्ष बंडू देशमुख व्यक्त केली आहे . परंतु एवढया मोठ्या महामारीचा सामना करण्यासाठी हया मध्यवर्ती रुग्णालयात साधन सुविधा व कर्मचारी उपलब्ध आहेत का.तसेच या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर खरंच उपचार होतो  का. हे रुग्ण या रुग्णालयात आल्यामुळे कोरोना  सारखा आजार बरोबर घेऊन जातायेत का हे  पाहणे अत्यंत गरजेच आहे असेही देशमुख यांनी सांगितले.

तसेच उल्हासनगर - ४ मधिल शासकिय  प्रसुतीगृह  हे कोविड रुग्णालय केल्यामुळे उल्हासनगर - ३ मधिल मध्यवर्ती रुग्णालयात प्रस्तुतीसाठी येणाऱ्या महिलांच्या संखेत सुध्दा मोठी वाढ झाली आहे. तसेच या ठिकाणी नवजात बालकांचा कक्ष सुध्दा आहे.त्याच्याच बाजूला आपले डायलेसीस सेंन्टर आहे. रुग्णालयाच्या तळ मजल्यावर सोनोग्राफी व एक्सरे रुम आहेत.व या रुग्णालयात येणारे रुग्ण बिंध्दास पणे कुठेही फिरतात व यावर कोणाचेही नियंत्रण नाही.रुग्णालय परिसर व रुग्णालयात फिरणारे रुग्ण कोरोना  पाॕझिटिव्ह सुध्दा असू शकतात हे पाहणे प्रशासनाचे काम असून सुध्दा रुग्णालय प्रशासन या बाबत गंभीर दिसत नाही.आज मितीला मध्यवर्ती रुग्णालय कोरोना  रुग्णांचा हाॕटस्पाॕट होत चालला आहे  हे दबक्या आवाजात रुग्णालय प्रशासन सुध्दा मान्य करीत आहे. व हे सर्व थांबविण्यासाठी आरोग्य विभागा कडून या रुग्णालयात कठोर उपाययोजना होणे गरजेचे आहे. व त्या साठी प्रशासना  कडून पुरेशा कर्मचारी वर्ग उपलब्ध  करुन देणे अत्यंत गरजेचे आहे असेही बंडू देशमुख यांनी आपल्या सांगितले आहे.  

मध्यवर्ती रुग्णालयात ओपीडी संपल्यानंतर येणाऱ्या रुग्णांना सामान्य वार्डा  मध्ये उपचाराठी घेतले जाते धक्कादायक म्हणजे कोरोना ची लक्षणे असलेला रुग्ण व सामान्य रुग्ण, तसेच कोरोना  पाॕझिटिव्ह रुग्ण यांना एकाच ठिकाणी दाखल करुन त्यावर उपचार केले जात आहेत. तर  कोरोना पाॕझिटिव्ह रुग्णाचा रिपोर्ट न आल्यामुळे त्याला कोविड हाॕस्पिटल मध्ये दाखल करता येत नाही.व कालांतराने या रुग्णाची आॕक्सिजन लेवल कमी होते अशा वेळेला रुग्णाला व्हेंटिलेटर ची  गरज भासते परंतु या रुग्णांलयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा असतांना सुध्दा या रुग्णालयात एकही व्हेंटिलेटर  उपलब्ध  नाही.तर  व्हेंटिलेटर  लावू शकणारे डाॕक्टर सुध्दा उपलब्ध नाहीत. या रुग्णालयात व्हेंटिलेटर ची  कुठली ही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रोज कितीतरी रुग्ण आपला जिव गमावत आहेत. आणि ही बाब खुपच गंभीर आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या  माध्यमातून यावर तात्काळ  उपाययोजना होणे गरजेचे आहे,नाहीतर रोज लोक मरत राहाणार आणि आम्ही माञ फक्त हताश पणे बघत राहणार असेही बंडू देशमुख यांनी सांगितले.त्यानी  शासनाच्या आरोग्य विभागाला विनंती  केली आहे की या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे प्राण वाचविणे आता फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे त्यामुळे या रुग्णालयात तात्काळ व्हेंटिलेटर  व त्यासाठी लागणारे कमीतकमी तीन तज्ञ डॉक्टर या रुग्णालयात उपलब्ध करुन दयावेत जेणे करुन आपल्याला या फुढे काही रुग्णांचे तरी प्राण वाचवता येतिल. या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाची आॕक्सिजन लेवल कमी होते तेव्हा त्याला व्हेंटिलेटर ची  आवश्यकता असते व ते मिळत नसल्यामुळे या रुग्णालयात दाखल असलेले आजूबाजूचे सामान्य रुग्ण ही  आपल्या डोळयांनी प्रत्यक्ष पणे  बघत असतात. त्यामुळे घाबरुन जाऊन   सुध्दा या रुग्णालयातील बरेच रुग्ण आता पर्यंत  मरण पावले आहेत. आणि ही  सर्व अवस्था आम्ही हताश पणे आमच्या उघड्या डोळयांनी बघत आहोत.ही बाब सुद्धा खुपच गंभीर आहे या रुग्णालयातील अशा असुविधे मुळे आपण अजून किती लोकांचे प्राण घेणार आहोत. आणि जर हे सर्व थांबवायच असेल तर यावर आपल्या माध्यमातून तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. आणि आपण त्या तात्काळ कराल अशी आशा देखिल देखमुख यानी व्यक्त केली आहे

संबंधित पोस्ट