राज्यात कोरोना रुग्णसंख्येने २ लाखांचा टप्पा ओलांडला

मुंबई : राज्यात दिवसभरात ७ हजार ७४ इतके कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले असून आणखी २९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा पार केला आहे.

बरे होण्याचे प्रमाण :- राज्यात दिवसभरात ३ हजार ३९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १,०८,०८२ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.०२ टक्के इतके झाले आहे. 

मृत्यूंची नोंद :- राज्यात ७ हजार ७४ नवीन रुग्णांचे निदान झाले तर २९५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यापैकी १२४ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १७१ मृत्यू त्याआधीच्या कालावधीतील आहेत.

नमुने :- सध्या राज्यातील मृत्यूदर ४.३३ टक्के आहे. आजपर्यंत पाठविलेल्या १०,८०,९७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,००,०६४ (१८.५१ टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

▪ सध्या राज्यात ५,९६,०३८ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ४१,५६६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

देशात २४ तासांत २२ हजारांहून अधिक नवीन रुग्ण

केंद्र आणि राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. २४ तासांत कोरोनाचे २२ हजार ७५५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २४ तासांत एकूण ६१० जणांना कोरोनाने मृत्यू झाला आहे.

एकूण संख्या :- देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६ लाख ७२ हजार ६४४ वर पोहचली आहे. कोरोनाने एकूण १९, २७९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोनाच्या २ लाख ४४ हजार ७४० जणांवर उपचार सुरू आहे. तर ४, ०८,६५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

दिल्ली:- दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. दिल्लीत २५०५ इतके नवीन रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात कोरोनाने ५५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९७, २०० इतकी झाली आहे.

तामिळनाडू :- तामिळनाडूत सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे ४ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाखांवर गेली आहे. शनिवारी ६५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील मृतांची एकूण संख्या १४५० इतकी झाली.

गुजरात :- गुजरातमध्ये २४ तासांत ७१२ नवे रुग्ण आढळेत. त्याचबरोबर २१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ३५, ३९८ इतकी झाली आहे. यापैकी २५, ४१४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण १९७२ जणांचा मृत्यू झाला आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट