उघड्या गटारामुळे होत असलेल्या अपघाताने नागरिक हैराण

स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांना नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी नसल्याचे यावरून दिसते..

मुलुंड :(शेखर चंद्रकांत भोसले) मुलुंड पश्चिम येथील सेवाराम लालवानी रोडवरील छेड़ा ड्रायफ्रूट दुकानाजवळील पदपथावर असलेल्या भूमिगत ड्रेनेज नाल्याचे झाकण गेल्या कित्येक दिवसांपासून गायब झाले असल्यामुळे येथून जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. उघड्या गटारात मागील १५ दिवसांत रात्रीच्या अंधारात दोन नागरिक पडून जखमी झाले असून भविष्यात अधिक अपघात होण्याचा संभव आहे त्यामुळे येथील झाकण लवकरात लवकर बसवून घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाने केली आहे.


मुलुंड पश्चिम येथील सामाजिक कार्यकर्ते शुलभ जैन यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की सेवाराम लालवानी रोड हा मुलुंड मधील मार्केट परिसरातील गर्दीचा रस्ता असून येथे सतत वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. गेल्या काही दिवसां पासून येथील पदपथावरील भूमिगत ड्रेनेज नाल्याचे झाकण गायब झाले असून यासंबंधीच्या तक्रारी पालिकेत तसेच स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांना करण्यात आल्या परंतु अद्याप काहीच कारवाई करण्यात आली नसून नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांना नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी नसल्याचे सांगितले. तसेच या रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढिग पडला असून कचरा देखील रोजच्या रोज उचलला जात नाही आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेने हा कचरा ताबडतोब उचलवा तसेच गटारावरील झाकण बसवावे अशी मागणी शुलभ जैन यांनी यावेळी केली आहे पालिकेच्या ड्रेनेज खात्याच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही .

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट