लॉकडाऊन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कल्याण पूर्वेतील ४ भाजी विक्रेत्यांवर गुन्हा दाखल ; ४ टेम्पोही केले जप्त
- by Adarsh Maharashtra
- Jul 04, 2020
- 636 views
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊन दरम्यान लॉकडाऊन नियमांचा भंग केल्या प्रकरणी प्रभाग ड क्षेत्र अधिकारी श्री. वसत भोंगाडे यांच्या निर्देशानुसार कोळसेवाडी पोलिसांनी शनिवारी पहाटे विठ्ठलवाडी पूर्वेत ४ भाजी विक्री करणाऱ्या टेम्पो चालकांविरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून हे चारही टेम्पो भाजी सह जप्त करण्यात आले आहेत .
कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे साठी कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासन हे युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहेत
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २ जुलै ते १२ जुलै या कालावधीत कडकडीत लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे.त्याची अंमलबजावणी पोलीस व महापालिका प्रशासन सयुक्त रित्या करीत आहे.याचाच एक भाग म्हणून ५-ड प्रभागाच्या कार्यक्षेत्रातील विठ्ठलवाडी स्टेशन परिसरात कुठलेही सुरक्षिततेचे नियम न पाळता ठरवून दिलेल्या जागे ऐवजी अन्य ठिकाणी विना परवानगी भाजी विक्रीचा बाजार सुरु असल्याचे प्रभाग ड क्षेत्र अधिकारी वसत भोंगाडे यांच्या निदर्शनास आले होते.
याबाबत संबंधीत भाजी विक्रेत्यांना समज देवून देखील त्यांनी त्याची दखल न घेल्याने शनिवारी पहाटे कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक श्री.शाहूराजे साळवे व प्रभाग क्षेत्र अधिकारी श्री.वसंत भोंगाडे यांनी त्यांचे पथकासह संयुक्त कारवाई करुन भाजी विक्रीच्या भाजीसह 0४ टेम्पो जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहेत महापालिकेच्या दोन वाहनांसह भाजीपाला जमा करण्यात आला.संबंधित भाजी विक्रेत्यांविरुध्द भा.दं.वि. १८८, २६९, २७० राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५चे कलम ५१ व तसेच कोविड-१९ उपाययोजना २० २० चे कलम ११ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यांत आलेले आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी व व्यावसायिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे आजाराचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी आवश्यक तो संपूर्ण काळजी घ्यावी, कामाशिवाय घराबाहेर पडू नये व महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम