मुंबईत बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण दिलासादायक आतापर्यंत ५२ हजार रुग्ण कोरोनामुक्त
- by Adarsh Maharashtra
- Jul 04, 2020
- 627 views
मुंबई: मुंबईत कोरोना संसर्गातून बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसाला ३०० ते पाच हजारावर रुग्ण कोरोना संसर्गातून बरे होऊन घरी परतत आहेत. शुक्रवारी एका दिवसांत तब्बल १,६९८ रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे. शुक्रवारपर्यंत ८१,६३४ एकूण रुग्णांपैकी तब्बल ५२,३९२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण मुंबईकरांसह पालिका आरोग्य विभागाची चिंता कमी करणारी आहे.
मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठी दिसत असली तरी बरे होऊन घरी परतणा-या रुग्णांची संख्या दिलासादायक आहे. एकूण शुक्रवारपर्यंत ८१,६३४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची नोंद झाली. यातून तब्बल ५२, ३९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ४,७५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्या अॅक्टीव २४,४८३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून ते मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची रोजची संख्या कधी घटते तर कधी वाढते आहे. गेल्या पाच दिवसाची रुग्णांची स्थिती लक्षात घेतली तर रुग्णांची संख्या कधी स्थिर तर कधी घटताना दिसते आहे. २८ जून रोजी १३०० नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. या दिवशी ८२३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. २९ जूनला १२४७ रुग्ण सापडले तर ३९१ रुग्ण बरे झाले. ३० जून रोजी ही संख्या तब्बल ३०० च्या आसपास कमी होऊन ९०३ नवीन रुग्णांची नोंद झाली. या दिवशी ६२५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.१ जुलै रोजी १५११ नवीन रुग्ण सापडले व या दिवशी ६२१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर २ जुलै रोजी १५५४ नवीन रुग्णांची नोंद झाली. ३ जुलैला १,६९८ रुग्णांनी कोरोनावर मात क त्यांना घरी सोडण्यात आले.
रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांचे तात्काळ क्वारंटाईन, वाढवण्यात आलेल्या चाचण्या, सेंटरमधील रुग्णांचे मानसिकता सकारात्मक राहिल यादृष्टीने प्रयत्न आदींमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे प्रशासना कडून सांगण्यात आले.
बरे झालेल्या रुग्णांचा दर -- ६४ टक्के
२६ जून ते २ जुलै पर्यंत कोरोना वाढीचा दर -- १.७२ टक्के
१ जुलैपर्यंत झालेल्या चाचण्या - ३,४४,९६८
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम