जकात नाक्यावरील कोविड उपचार केंद्रात अधिक रुग्णांना घेण्यास पालिकेची मनाई
- by Adarsh Maharashtra
- Jul 04, 2020
- 664 views
मुलुंड :(शेखर चंद्रकांत भोसले) अधिकृत उद्धाटन किंवा लोकार्पण सोहळा न करता मुलुंड पश्चिमेकडील जकात नाक्याच्या प्रशासकीय रुग्णालयात पालिकेने उभारलेले १२५ बेडचे कोविड उपचार केंद्र बुधवारी १ तारखेला चालू करण्यात आले परंतु अपुऱ्या वैद्यकीय कर्मचारी वर्गामुळे येथे सध्या फक्त ३० च रुग्ण घेण्यात आले असून अधिक रुग्णांना दाखल करुन घेण्यास पालिकेच्या टी वार्डच्या प्रशासनाने नकार दिला असल्याचे समजले त्यामुळे मुलुंडमधील नवीन कोरोना बाधित रुग्णांना मुलुंड बाहेरील इतर खाजगी रुग्णालये शोधावी लागत असून त्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
मुलुंड पश्चिमेकडील जकात नाक्याच्या प्रशासकीय इमारतीत पालिकेचे कोविड उपचार केंद्र गेल्या १५ दिवसांपासून बनवून तयार होते परंतु वैद्यकीय कर्मचारी ऊपलब्ध होत नसल्यामुळे या उपचार केंद्राचे लोकार्पण करायला पालिका प्रशासन टाळाटाळ करीत होती. त्यामुळे मुलुंडमधील वाढत्या कोरोना बाधित रुग्णांची जकात नाक्यावर तयार असलेल्या कोविड उपचार केंद्रात सोय व्हावी यासाठी हे केंद्र ताबडतोब सुरू करा अशी मागणी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यां कडून टी वार्ड पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने करण्यात येत होती. ह्या मागणी नुसार आवश्यक वैद्यकीय कर्मचारी ऊपलब्ध न करता फक्त एक डॉक्टर आणि एक वार्ड बॉय यांच्या जीवावर हे कोविड सेंटर १ जुलै रोजी कोणताही अधिकृत लोकार्पण सोहळा न करता पालिकेतर्फे सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी येथे भराभर रुग्ण दाखल व्हायला लागल्याने या रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरविताना ऊपलब्ध वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर ताण यायला लागला त्यामुळे येथे अधिक रुग्ण दाखल करुन घेण्यास टी वार्ड पालिका प्रशासनाने नकार दर्शविला. सध्या येथे फक्त ३० कोविड रुग्णांवरच उपचार करण्यात येत असून नवीन रुग्णांना भरती करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन कोरोना रुग्णांची फरफट होत असून त्यांना उपचारासाठी मुलुंडबाहेरील खाजगी रुग्णालये शोधत फिरावे लागत आहे.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी पालिका अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता तेथील पालिकेचे अधिकारी ठाकरे यांनी उडवा उडवीची उत्तरे देवून उर्मटपणे बोलून अधिक माहिती देणे टाळले. पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ अजय डाकणे यांच्याकडे विचारणा केली असून वैद्यकीय कर्मचारी ऊपलब्ध होत नसल्यामुळे आहे त्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे म्हणून सध्या फक्त ३० च रुग्णांना येथे प्रवेश देण्यात आला आहे. वैद्यकीय कर्मचारी मागविण्यात आले आहेत. वैद्यकीय स्टाफ वाढला तरच येथील कोविड उपचार केंद्रात अधिक रुग्णांना दाखल करुन घेण्यात येईल व त्यानंतरच हे कोविड सेंटर आम्ही पूर्ण क्षमतेने कार्यरत करु, असे सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम