कोरोना पादुर्भावमुळे सध्यातरी बायोमेट्रीक हजेरी करू नका.!पालिका समनव्य समितीचा निर्णय!

मुंबई दि,04 (जीवन तांबे )मुंबईत कोरोनांच्या काळात पालिका आयुक्त यांनी पालिका कामगार यांना बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक केली असल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

कामगार समनव्य समितीने आयुक्त यांच्या बरोबर बैठक घेऊन तोडगा काढला असल्याने कामगारांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत कोरोनांने थैमान घातले असून या महामारीत पालिका कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून काम करीत आहे. हे काम करीत असताना कित्येक कामगार बळी पडत आहे.हा संसर्ग रोखण्याकरिता पालिकेने बायोमेट्रिक हजेरी बंद केली होती. 

मुंबई शहर व उपनगरात आजही दररोज हजाराच्या वर  कोरोना बाधित रुग्ण आढळत असताना पालिका आयुक्त  इक्बालसिंह चहल यांनी ता.1 जुलै रोजी परीपत्रक काढून पालिका कामगारांना  ता.6 जुलै पासून  बायोमेट्रिक हजेरी लावणे बंधनकारक केले होते. त्यामुळे पालिका कामगार व सर्व कामगार युनियन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  याबाबत पालिका कर्मचारी समन्वय समितीच्या नेत्यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या सोबत नुकतीच अँप्सद्वारे बैठक घेऊन चर्चा केली.  या बैठकीत सध्या तरी बायोमेट्रिक हजेरी निर्णय पुढे ढकलण्यात आला असल्याचे समनव्य समितीच्या नेत्यांनी  सांगितले आहे. याबाबत आयुक्त यांनी परिपत्रक अद्याप जारी केलेले नाही.

सदर परिपत्रक मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्या सही होऊन मा. आयुक्त महोदय यांचे सहीसाठी परिपत्रक गेलेले आहे, सदर परिपत्रक सोमवारी येईल. परंतु सोमवार ता. 6 जुलै पासून बायोमेट्रिक हजेरी करू नये असा निर्णय समन्वय समितीच्या समवेत झालेल्या सभेमध्ये मा. आयुक्त महोदय यांनी घेतलेला आहे.तरी रुग्णालय, आरोग्य खात्यासहित अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी करू नये असे आव्हान म्युनिसिपल मजदुर युनियन यांनी केले आहे.अध्यक्ष - ऍड. सुखदेव काशीद,सरचिटणीस - महाबळ शेट्टी, कार्याध्यक्ष - वामन कविस्कर,  अशोक जाधव व चिटणीस प्रदीप नारकर उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट