सागरी किनारा रस्ता' प्रकल्पाचे तीन 'नियंत्रण कक्ष' कार्यान्वित; '१९१६' या दूरध्वनीवरही करता येणार तक्रार
- by Adarsh Maharashtra
- Jul 04, 2020
- 1031 views
मुंबई दि .४ जुलै:दक्षिण मुंबईतील शामलदास गांधी मार्ग' ते 'राजीव गांधी सागरी सेतू' यांना जोडणारा ९.९८ कि.मी. लांबीचा 'सागरी किनारा रस्ता' (कोस्टल रोड) हा महापालिकेचा महत्त्वाचा आणि विविध घटक असलेला देशातील या प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम यापूर्वीच सुरु झाले असून येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी कंत्राटदारांच्या स्तरावर घेतली जात आहे. तसेच महापालिकेच्या किनारी रस्ता खात्याद्वारे याबाबत आवश्यक ते पर्यवेक्षणही नियमितपणे केले जात आहे. तथापि, अपवादात्मक प्रसंगी या प्रकल्प कामांमुळे पाणी साचण्याची समस्या उद्भवल्यास तात्काळ कार्यवाही करण्याच्या उद्देशाने महापालिका प्रशासनाच्या सुचने नुसार संबंधित कंत्राटदारांद्वारे तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. प्रियदर्शिनी उद्यान, अमरसन्स उद्यान व वरळी डेअरी या तीन ठिकाणांच्या जवळ हे नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून नियंत्रण कक्ष महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन खात्याच्या मुख्य नियंत्रण कक्षाशी जोडलेले आहेत. तरी 'कोस्टल रोड'चे बांधकाम सुरु असलेल्या भागात पाणी साचण्याची समस्या उद्भवल्यास नागरिकांनी संबंधित नियंत्रण कक्षाकडे किंवा पालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या '१९१६' या दूरध्वनीवर तक्रार नोंदवावी किंवा त्याबाबतची माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे .
'कोस्टल रोड' च्या 'पॅकेज १' करिता अमरसन्स उद्यानाजवळ उभारण्यात आलेल्या नियंत्रणात कक्षाचा आपत्कालीन क्रमांक ०२२–२३६१-०२२१ असा आहे. तसेच राकेश सिंग सिसोदीया या नियंत्रण कक्षाच्या संपर्क अधिका-यांशी ९१६७-०६१-१०६ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येऊ शकेल. तसेच संबंधित प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार यांचे प्रतिनिधी देवेंद्र प्रसाद व निवासी अभियंता राजेश जाधव यांच्याशी अनुक्रमे ९९६७-०१४-३६२ व ९७०२-४६७-५७५ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर देखील संपर्क साधता येऊ शकेल.
'कोस्टल रोड' च्या 'पॅकेज २' करिता वरळी डेअरी समोर उभारण्यात आलेल्या नियंत्रणात कक्षाचा आपत्कालीन क्रमांक ०२२–२४९०-०३५९ असा आहे. तसेच . अविक पांजा व आजाद सिंग या नियंत्रण कक्षाच्या संपर्क अधिका-यांशी अनुक्रमे ८६५७-५००-९०० व ९८१९-०२६-५९५ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येऊ शकेल. तसेच प्रकल्प व्यवस्थापक स्वर्णेंदु सामंता व शशिकांत एस. व्ही. यांच्याशी अनुक्रमे ७०१६-७६५-०७६ आणि ९१३६-९९३-७०३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर देखील संपर्क साधता येऊ शकेल.
कोस्टल रोड' च्या 'पॅकेज ४' करिता प्रियदर्शिनी उद्यानाजवळ असणा-या एम.एस.आर.डी.सी. च्या कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या नियंत्रणात कक्षाचा आपत्कालीन क्रमांक ०२२–२३६२-९४१० असा आहे. तसेच संदिप सिंग व उत्पल दत्ता या नियंत्रण कक्षाच्या संपर्क अधिका-यांशी अनुक्रमे ९९५८-८९९-५०१ व ९९५८-७९३-०१२ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येऊ शकेल. तसेच प्रकल्प व्यवस्थापक किम जॅन्ग यॉन्ग व निवासी अभियंता विजय जंगम यांच्याशी अनुक्रमे ७०४५-९०१-३६६ व ७०८५-४९३-६३८ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर देखील संपर्क साधता येऊ शकेल.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम