
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे 'कोरोना'मुळे निधन
दत्ताकाकाच्या जाण्याने आम्ही महत्त्वाचा शिलेदार गमावला, जयंत पाटलांनी व्यक्त केला शोक
- by Adarsh Maharashtra
- Jul 04, 2020
- 1410 views
तर भाजपचे आमदार महेश लांडगे यांनीही दत्ता साने यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.
पिंपरी :चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. शनिवारी आज, सकाळी चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांना २५ जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारा दरम्यान आज सकाळी त्यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांना कोरोनासह निमोनियाची देखील लागण झाली होती. दत्ता साने यांच्या पश्चात आई, पत्नी हर्षदा, मुलगा यश, मुलगी आणि दोन मोठे भाऊ असा परिवार आहे.
दत्ता साने यांच्याविषयी.
दत्ता साने हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. ते चिखली परिसरातून तीनवेळा निवडून देखील आले होते. लॉकडाऊन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली होती. या काळात त्यांनी अन्नधान्यांचे वाटप केले होते. त्यामुळे ते अनेकांच्या संपर्कात आले होते. तसेच ते चिखली परिसरात 'दत्ताकाका' या नावाने संपूर्ण शहरात परिचित आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादीचे धडाकेबाज नगरसेवक दत्ताकाका साने यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांना हे जग सोडून निघून जावं लागलं आहे. त्यांच्या अकाली मृत्यूने राष्ट्रवादीत सन्नाटा पसरला आहे. दत्ताकाकाच्या जाण्याने आम्ही महत्त्वाचा शिलेदार गमावला असल्याची भावना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
जयंत पाटील यांनी ट्विट करून दत्ताकाका साने यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नगरसेवक दत्ताकाका साने यांच्या निधनाची बातमी नुकतीच समजली. दत्ताकाका साने यांच्या निधनाने राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाचा महत्त्वाचा शिलेदार गमावला आहे.त्यांचा परिवार व त्यांचे कार्यकर्ते यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
दुसरीकडे सध्या कोरोनाने ग्रासलेले आणि रूग्णालयात उपचार सुरू असलेले भाजपचे आमदार महेश लांडगे यांनीही साने यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. तसंच आपण एक जवळचा मित्र गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्र परिवाराला हे दु: ख पचवण्याची ताकद ईश्वर देवो, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.तसेच माझे सहकारी-मित्र-मार्गदर्शक दत्ताकाका साने यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्विट त्यांनी केलंय.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम