काँग्रेसकडून चीनचे लांगूलचालन - आर.के.सिन्हा

वर्तमानात भारत दिवसेंदिवस फोफावत जाणारा कोरोना साथरोग आणि सीमेवर चीनच्या कुरापती अशा दुहेरी संकटाचा एकाच वेळी समर्थपणे सामना करीत आहे. परंतुसंकटाच्या का अवघड काळात काँग्रेस आणि त्यांचे नेते राहुल व सोनिया गांधी दररोज केंद्र सरकारवर चीनवरून प्रश्नांची सरबत्ती करताना दिसतात. त्यावरून अशी शंका निर्माण होते कीहे लोक भारतासोबत नसून चीनच्या बाजूने उभे ठाकले आहेत. कधी कधी असे वाटते कीहे लोक परिस्थितीचे आकलन करण्यात अपयशी ठरले असून त्यांच्याबद्दल चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे कीचीनने भारताच्या एक इंच जागेवर देखील अतिक्रमण केलेले नाही. आमच्यासाठी देशाचे सार्वभौमत्त्व महत्त्वाचे असून त्यासंदर्भात कुठलीही तडजोड केली जाणार नाही. देशाची परिस्थिती लक्षात घेतली असता याबाबत पंतप्रधानांचे वक्तव्य विश्वसनिय आणि अधिकृत आहे. परंतुसोनिया व राहुल गांधींना ते समजूनच घ्यायचे नाही असे दिसून येते. कारण कोरोना साथरोगाचा प्रकोप वाढत असतानाच काँग्रेस वारंवार चीनच्या मुद्यावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करीत आहे. वास्तविक पाहता या संकट काळात राहुल गांधी घृणित राजकारण करीत आहेत. राहूलसोनिया आणि काँग्रेस नेत्यांची विधाने ऐकून चीनला नक्कीच आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. तसेच चीनकडून राजीव गांधी फाऊंडेशनला लक्षावधी डॉलर्सच्या देणग्या मिळाल्यामुळे काँग्रेस देखील असे प्रश्न उपस्थित करून कर्तव्यनिष्ठेचे पालन करीत असावी. 

चीनशी संघर्ष 1962 ते डोकलाम 

भारताच्या विरोधात जाऊन शत्रुला खुष करणारी भाषा वापरणा-यांनी 1962च्या पराभवापासून ते डोकलाम संघर्षापर्यंत इतिहासाची पाने उलटून पाहण्याची गरज आहे. तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या अदूरदर्शीपणामुळे आमचे शेजारी राष्ट्र असलेल्या तिबेटला आपले अस्तित्व गमवावे लागले होते. त्यामुळे आम्ही 1962 च्या युद्धात ओढल्या गेलो आणि पराभूत झालो. त्या युद्धाला 58 वर्षे लोटल्यानंतर अजूनही चीन अक्साईचीनच्या 37, 244 वर्क किलोमीटर क्षेत्रावर अवैध कब्जा करून बसला आहे. गेल्या 58 वर्षात हा भूभाग परत मिळवण्यासाठी तसूभरही प्रयत्न करण्यात आले नाहीत. इतकेच नव्हे तर संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व भारताला मिळत असतानाच नेहरूंनी त्यासाठी चीनचे नाव पुढे केले होते. त्यावेळी नेहरूंना स्वतःला जागतिक नेता म्हणून जगापुढे यायचे होते. परंतुनेहरूंना जागतिक नेतेपद मिळाले नाही आणि देशाच्या सीमांची सुरक्षाही करता आली नाही. जम्मू-काश्मीरच्या समस्येचे पालकत्त्व देखील नेहरूंकडेच जाते. जर नेहरूंनी हट्टाला पेटून काश्मीर प्रश्नात नाक खुपसले नसते तर सरदार पटेल यांनी देशातील इतर राज्यांप्रमाणे जम्मू-काश्मीरचा मुद्दा देखील यशस्वीपणे हाताळला असता यात शंका नाही. परंतुदुर्दैवाने नेहरू स्वतःला सर्वाधिक समजुतदार व तज्ज्ञ समजत होते आणि त्यामुळे देशाला प्रचंड ससेहोलपट सहन करावी लागली. तत्कालिन कॅबिनेटमधील परदेशी प्रकरणाशी संबंधीत समितीचे सदस्य असलेले गृहमंत्री सरदार पटेल यांनी 1950 साली लिहीलेल्या एका पत्रात चीन आणि त्याचे तिबेटबाबतचे धोरण यापासून सावध राहण्याचा इशारा दिला होता. इतकेच नव्हे तर सरदार पटेल यांनी चीनला भावी शत्रु देखील म्हंटले होते. परंतुत्यावेळी नेहरूंनी पटेलांच्या प्रत्येक गोष्टीकडे कानाडोळा केला आणि पटेलांनी चीनबाबत व्यक्त केलेली भीती दुर्दैवाने 1962 साली खरी ठरली. 

 शिघ्रकोपी नेहरू 

चीनकडून झालेल्या दारूण पराभवानंतर भारतीय संसदेत 14 नोव्हेंबर 1963 रोजी आयोजित चर्चेच्या प्रस्तावावर बोलताना नेहरू म्हणाले होते कीचीनच्या वर्तणुकीबाबत आश्चर्य आणि दुःख होते आहे. चीनने भारताच्या पाठित खंजिर खुपसल्याचे नेहरू समजावून सांगत असतानाच करनालचे खासदार स्वामी रामेश्वरनंद यांनी “अखेर तुम्हाला चीनचा खरा चेहरा कळला” असा टोला नेहरूंना लगावला. त्यावर संतापलेल्या नेहरूंनी स्वामी रामेश्वरनंद यांना सीमेवर जाण्याचा सल्ला दिला. आपणे बोलणे पुढे नेत चीनने युद्धाची पूर्वतयारी कशा पद्धतीने केली होती याचे वर्णन केले. त्यावेळी पुन्हा एकदा खासदार स्वामी रामेश्वरनंद यांनी नेहरूंना प्रश्न केला कीचीन युद्धाची तयारी करीत असताना आपण काय करीत होतो याप्रश्नावर नेहरू पुन्हा संतापले आणि खा. रामेश्वरनंद यांना काहीच समजत नसून ते परराष्ट्र व्यवहारात शून्य असल्याची टीका नेहरूंनी केली होती. अक्साई चीनचे 37 हजार वर्ग किलोमीटर क्षेत्र चीनने बळकावल्यानंतर नेहरू म्हणाले होते कीअक्साई चीनचे काय करायचे तिथे गवताची काडी सुद्धा उगवत नाही. नेहरूंच्या या विधानानंतर एका सदस्याने त्यांना डोक्यावरील केस गळलेत म्हणून तुम्ही स्वतःची मान कापून घेणार का असा प्रश्न विचारला होता. 

 चीनला सडेतोड प्रत्युत्तर

चीनकडून झालेला पराभव इतिहासजमा झाला असून आजचा भारत नजरेला नजर भीडवून सडेतोड प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. डोकलाम प्रकरणात वर्तमान भारत सरकारने चीनला त्याची लायकी दाखवून दिली आहे. आता तर भारताने चीनचा प्रत्येक पातळीवर सामना करण्याची तयारी केलीय. भारत संपूर्णपणे सज्ज असला तरी आम्ही चर्चेची दारे बंद केलेली नाहीत. लद्दाखच्या गलवान खो-यात 15 जून रोजी झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारताने आक्रामक धोरण स्वीकारत चीनला त्यासाठी जबाबदार धरले आहे. तसेच आमचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी याबाबत दूरध्वनीवर चर्चा करून भारताची रोखठोक भूमिका विषद केलीय. आमच्या या धोरणामुळेच चीन आता सीमेवरील वाद मिटवण्याच्या प्रयत्नात आहे. जर भारत-चीन युद्ध झाल्यास संपूर्ण जग भारतासोबत उभे राहिल याची चीनला पुरेपूर जाणिव झालीय. भारताचे धोरण नेहमीच शांततेचे राहिले आहे. तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी आमचे आदर्श आहेत. परंतुयाच भारतात भीमअर्जुनमहाराणा प्रतापछत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाईने जन्म घेतला होता. भारत त्यांना आपला नायक मानतो. गलवान खो-यात भारताच्या 20 जवानांनी हौतात्म्य पत्करले असले तरी आम्ही चीनचे 45 सैनिक यमसदनी पाठवले आहेत हे चीनच्या लवकर लक्षात आले तर बरे होईल. 


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट