चीनबरोबर दीर्घकालीन युद्धासाठी तयार रहा . हेमंत महाजन
- by Adarsh Maharashtra
- Jun 30, 2020
- 256 views
भारतीयांनी चीनबरोबर वेगवेगळ्या पातळ्यांवर दीर्घकालीन युद्धासाठी तयार राहिले पाहिजे, असे आवाहन निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी केले. `चीनविरुद्ध हिंदुस्थान - हायब्रीड युद्ध’ या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेत ते बोलत होते.
एक दिवस असा येईल की, आपण सकाळी उठल्यावर आपल्याला आक्साई चीन आणि पीओेके आपल्या हद्दीत आल्याचे दिसेल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आक्साई चीनमध्ये संपूर्ण भारताला पुरेल इतकी सौर उर्जा प्रकल्प सामावून घेण्याची क्षमता आहे. भारत त्याचा ताबा घेईल, अशी भीती चीनला आहे. त्यांची वृत्ती ही वेगवेगळ्या माध्यमातून दिसून येते. चीन भारतातील वृत्तपत्रं, पत्रकारांनादेखील फूस लावून अर्थपुरवठा करत आहे. मात्र, तसे सिद्ध झाले तर तर इथल्या पत्रकार आणि प्रसामाध्यमांविरुद्ध देशद्रोहाचे खटले दाखल होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
श्रीलंकेला कर्ज देऊन आता ते फेडता येत नाही म्हणून त्यांचे बंदर ताब्यात घेऊन तिथे लष्करी तळ बनविण्यासाठी चीन काम करत आहे. ताब्यात असलेल्या तिबेटमध्ये न्यूक्लिअर रिअॅक्टरमधून बाहेर पडणारे न्यूक्लिअर वेस्ट टाकून तिथल्या जनतेला त्रास देत आहे.
पहिली फेरी भारताने जिंकली
चीन गलवानपासून २-३ किलोमीटर मागे हटलाय, ही पहिली फेरी भारताने जिंकली आहे. १९७८ नंतर पहिल्यांदाच चीनमध्ये चीनचे जवान युद्धात मारले गेले आहेत. चीनच्या जवानांनादेखील दीर्घकाळ युद्धाचा अनुभव नाही. चीनच्या या कारवायांमुळे जगभरातून असंतोष निर्माण झालाय. भारतानेही `आत्मनिर्भर भारत’ची घोषणा करत चीनच्या मालावर बहिष्कार प्रारंभ केलाय. येत्या काही दिवसांत किंवा वर्षांत आपण चीनवर अजिबात अवलंबून राहणार नाही. ही चीनची फार मोठी हार आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत भारताने बाजी मारली आहे, असेच म्हणावे लागेल.
अंतर्गत समस्यांनी त्रस्त झालाय चीन
चीन अंतर्गत संकटानेदेखील ग्रासला आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, उत्पन्नात घट, सामाजिक आंदोलनं, मानवी अधिकार समस्या एवढेच काय भारताबरोबरच्या चकमकीत ठार झालेल्या चीनच्या जवानांना लपवून त्यांना सन्मान न दिल्याने झालेला असंतोष, अशा अनेक समस्या आहेत. त्याशिवाय जगभरातून चीनच्या बाबतीत असंतोष वाढला आहे. त्यामुळेच चीनला आताच नेस्तनाबूत करण्याची संधी घेतली पाहिजे.
चीनच्या नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सवलती दिल्या जात असल्या तरी तिथे व्यक्तिस्वातंत्र्यावर बंदी आहे. प्रसारमाध्यमांची गळचेपी केली जाते. नागरिकांना राजकीय स्वातंत्र्य नाही. त्यामुळे चीनमधील श्रीमंत नागरिकदेखील अनेक बाबतीत स्वातंत्र्य नसल्यामुळे नाराज आहेत.
मनोवैज्ञानिक युद्धावऱ भर
मानसिक पातळीवर चीन कारवाया करत आहे. प्रसारमाध्यमांना नकळत अर्थपुरवठा करून चीनच्या विरुद्ध मत व्यक्त होऊ नये, याची काळजी घेत आहेत. अनेक वृत्तपत्र त्यांनी अशा पद्धतीने वश केली आहेत. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट सारखी वृत्तपत्रंदेखील चीनच्या विरुद्ध `ब्र’ काढत नाही. अन्य देशांमध्ये आंदोलनं व्हावीत, यासाठी तिथल्या संघटनांनादेखील चीनकडून वेगवेगळ्या मार्गाने अर्थपुरवठा होत आहे. याबाबतीत दक्ष राहण्याची गरज आहे. बुद्धीजीवींना खरेदी करण्याचे तंत्रदेखील सर्रासपणे वापरत आहे. अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या देशांमध्ये शिक्षणासाठी पाठवून त्यांच्यामार्फत हेरगिरी केली जाते. हे विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांचे संशोधनदेखील चोरून चीनला पुरवत आहे, अशी अनेक प्रकरणे असून त्याच्यावर लक्ष दिले पाहिजे.
बळकावलेल्या राष्ट्राला गुलामाची वागणूक
तिबेट तसेच झिनजिआंगच्या मुख्य भूमीतील नागरिकांना अन्यत्र बसवून ठेवले आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना गुलामाची वागणूक दिली जाते. न्यूक्लिअर रिअॅक्टरकडून निघणारे रेडिओअॅक्टिव्ह प्रदूषण तिबेट तसेच झिनजिआंग भागात सोडले जाते. तिथे सामूहिक नसबंदी तसेच अन्य माध्यमातून मानवी हक्कांवर गदा आणली जाते. त्यामुळे तिथल्या जनतेमध्येही संतापाची भावना आहे. झिनजिआंग, इनर मंगोलिया हे भाग वेगळे झाले तर चीनचा भूभाग अत्यंत कमी होईल. त्या भागात अल्पसंख्यांक अधिक आहेत. तसेच, तिथे नैसर्गिक साधनसंपत्ती अधिक आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांनी मनात आणले तर मूळ चीनचे काही चालणार नाही. ऱिफॉर्मेशनच्या नावाखाली मुसलमानांचा छळ केला जातो. प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य नसल्यामुळे या बातम्या बाहेर येत नाहीत.
बांगलादेशला अर्थपुरवठा करण्यावर चीन सध्या भर देत आहे. ही गोष्ट त्यांना गुलाम बनविण्याच्या प्रक्रियेचा भाग असला तरी भारतासाठी चांगले आहे. कारण त्यामुळे बांगलादेशची भारतात होणारी घुसखोरी काही प्रमाणात कमी होईल.
तिबेट नागरिकांच्या संदर्भात उपस्थित केलेल्या मुद्याबाबत बोलताना ते म्हणाले की, तिबेटच्या नागरिकांचा धर्मावर अधिक विश्वास आहे. सैनिकीकरण तसेच अन्य बाबींकडे त्यांनी ध्यान न दिल्यामुळेच त्यांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या भाबडेपणाचे उदाहरण म्हणजे त्यांना वाटते की, जोपर्यंत आकाश निळे आहे. तोपर्यंत तिबेट मुक्त आहे. तिबेट चीनचा नाही उलट चीन हा तिबेटचा भाग होईल, असा त्यांना विश्वास आहे. तसे झाले तर आंनदच आहे. त्यामुळे त्यांचा ताबा घेणे चीनला सहजशक्य झाले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम