चेंबूर येथील सायन-पनवेल मार्गावरील अंधाराचे साम्राज्य

मुंबई (जीवन तांबे) : चेंबूर येथील सायन-पनवेल मार्गावरील कित्येक  दिवसांपासून पथदिवे बंद आहेत. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
चेंबूरच येथील डायमंड गार्डन ते उमर्शी बाप्पा चौक पर्यन्त पथदिवे बंद आहेत. रात्रीच्या वेळेस पादचार्‍यांना तसेच वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. जोरात पाउस पडत असताना याठिकाणी एखाद्या पादचाऱ्याचा अपघात घडण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.
मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे मागील वर्षभरात या मार्गावर अनेकदा पथदिवे बंद अवस्थेत आढळून येत आहेत. यामुळे मेट्रोच्या बॅरिकेटच्या अडून पादचारी रस्ता ओलांडत असल्यास अंधार असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी या मार्गावर अनेक अपघात देखील घडले आहेत. लॉकडाउन च्या काळात रस्ते काहीप्रमाणात मोकळे असल्याने वाहनांचा वेग देखील वाढला यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पदपथावरील काही नाल्यांची झाकणे उघडी असल्याने अंधारात येथे पादचारी नाल्यात पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. संबंधित प्राधिकरणाने या समस्येकडे लक्ष देऊन या मार्गावरील दिवे सुरू करण्यात यावेत अशी मागणी नागरिक करीत आहेत.

संबंधित पोस्ट